चीन मध्ये पुन्हा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशाील अनेक शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इतर देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान WHO जागतिक आरोग्य संघटनेने एका वेगळ्याच धोक्याचा इशारा दिला आहे. हा धोका कोरोनाचा नसून दुसऱ्याच रोगाचा आहे. खरे तर जागतिक आरोग्य संघटना एक अहवाल तयार करत आहे ज्यामध्ये भविष्यात मानवासाठी कोणकोणते आजार धोकादायक असतील याचा समावेश आहे. यामध्ये सगळ्यात घातक असणार आहे Disease x डीसीज x.
काय आहे डीसीज X
ebola इबोला व्हायरस च्या संशोधनात असलेल्या शास्त्रज्ञांनी डीजीज x संदर्भात सुचित केले आहे. हा असा रोग आहे ज्याबद्दल अद्याप कोणालाच माहिती नाही. हा रोग कशामुळे होईल, कोणत्या देशातुन याची सुरुवात होईल आणि त्याला कसे नष्ट करता येईल याची कल्पना अजुन कोणालाच नाही.
दक्षिण आफ्रिकेत केसेस आढळले
कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हाच डिजीज x बद्दल चर्चा सुरु होती. २०२१ मध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की भविष्यात येणारा हा धोका इबोलापेक्षाही घातक असू शकतो. पश्चिम आफ्रिकेत आलेल्या या व्हायरसमुळे ८० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, डीजीज x ची सुरुवात प्राणी पक्षांमधुन झाली आहे. या आजाराची लक्षणं इतरही आजारामध्ये दिसली आहेत. कोरोना देखील वटवाघुळांमुळे पसरला होता. सार्स आणि मर्सचेही तेच आहे. त्यामुळे डीजीज x सारखा व्हायरसही प्राणी पक्षांमधुन येईल असा अंदाज आहे.