सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये महिलांची धावपळ सुरूच असते. अशातच घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना त्यांची तारांबळ उडते. ज्यामुळे त्या अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्षं करतात. अशातच त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही काही सुपरफुड्सबाबत सांगणार आहोत. ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने महिला स्वतःला हेल्दी ठेवू शकतात.
सफरचंद
सर्व फळांमध्ये सफरचंद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे डॉक्टर आपल्याला दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. ज्या महिला दररोज एक सफरचंद खातात त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहण्यास मदत होते. सफरचंदामध्ये असलेले व्हिटॅमिन आणि पोषक तत्व कोणत्याही आजारावर फायदेशीर ठरतात. सफरचंद खाल्याने शरीरामध्ये असणारी रक्ताची कमतरता दूर होते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
आवळा
आवळा महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीसोबत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. याव्यतिरिक्त आवळ्यामध्ये ओमेगा 3 आणि फायबरदेखील असतं. याचं सेवन केल्याने महिलांना पोटाच्या समस्या होत नाहीत, तसेच पचनक्रिया सुरळीत होते. तसेच आवळ्याच्या सेवनाने डोळ्यांसोबतच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
डाळिंब
अधिकाधिक महिलांच्या शरीरामध्ये आयर्नचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे महिलांना आपल्या खाण्यामध्ये डाळिंबाचा समावेश करणं आवश्यक असतं. कारण डाळिंबामध्ये आयर्नचे प्रमाण अधिक असते. डाळिंबामध्ये 84 टक्के आयर्न अस्तित्वात असतं. डाळिंब खाल्याने ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहतं. त्यामुळे महिलांनी दररोज एक डाळिंब खाणं गरजेचं आहे.
दूध
वाढत्या वयानुसार, महिलांच्या शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता भासते. ज्यामुळे त्यांची हाडं कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येक महिलेने एक ग्लास दूध पिणं गरजेचं आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराला कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. त्याचबरोबत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.