- मयूर पठाडे
बर्याच जणांचा मुख्य हेतू असतो, आपलं वाढलेलं वजन कमी करण्याचा. त्यासाठी त्यांच्याकडे दोन मार्ग उपलब्ध असतात. एक म्हणजे डाएट कंट्रोल आणि दुसरा म्हणजे एक्सरसाईज.
मग काय करायचं? फक्त खाण्यापिण्यावर कंट्रोल करून आपले वाढलेले किलो कमी करायचे कि व्यायाम करून, जिममध्ये जाऊन, जॉगिंग ट्रॅकवर रनिंग करून आपलं वजन आटोक्यात ठेवायचं?
प्रत्येक जण आपल्याला आवडेल त्या पद्धतीचा वापर करतो. कोणी वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट कंट्रोल करतं तर कोणी घाम गाळून वजन कमी करतं.
दोन्ही गोष्टींनी वजन कमी होतंच, पण नेमकं काय करायचं, योग्य मार्ग कोणता, हा अनेकांच्या मनात प्रo्न असतो.
नुसत्या डाएट कंट्रोलनंही वजन कमी होतंच, पण तुमच्या शरीराला बळकटी देण्यासाठी, तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी, तुमचे टिश्यूज स्ट्रॉँग करण्यासाठी व्यायामाचीही तेवढीच गरज असते. याशिवाय तुमच्या शरीरातील कोलेस्टोरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी, तुमचे ताणतणाव कमी करण्यासाठी, तुमची झोप योग्य तर्हेने व्हावी यासाठीही व्यायामाचा खूप मोठा उपयोग होतो.
वजन कमी करण्याचा
सर्वात स्मार्ट उपाय
वजन कमी करायचं असेल तर अर्थातच दोन्हीही गोष्टी करायला हव्यात. तुमचं डाएटवरही कंट्रोल हवं आणि व्यायामही करायला हवा. त्याचं प्रमाण काय असावं? यावर शास्त्रज्ञांनी, फिटनेस एक्सपर्ट्सच्या मदतीनं शोधलेला सर्वाेत्तम मार्ग म्हणजे 75 टक्के डाएट आणि 25 टक्के एक्सरसाईज. वजनावर कंट्रोल ठेवण्याचं हे सर्वोत्तम सूत्र आहे.
यासाठी अर्थातच तुमच्या खाण्यापिण्यावर आणि योग्य आहारावरही तुमचं नियंत्रण हवं. समजा ज्या खाद्यपदार्थांत 500 पेक्षाही जास्त कॅलरीज आहेत, असे फास्ट फूड जर तुम्ही खात असाल तर त्याचा प्रभाव न्यूट्रल करण्यासाठी तुम्हाला चार मैलापेक्षाही जास्त पळावं लागेल. रनिंग करावी लागेल. पण असे पदार्थ खाण्याचं तुम्ही टाळलंत, कमी काबरे हायड्रेट्स असलेले पदार्थ घेतले तर वजन आटोक्यात राहील आणि धापा टाकत खूप व्यायाम करायचीही गरज पडणार नाही.
अर्थात फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अगदी मॅरेथॉनमध्येच धावलं पाहिजे, किंवा खूप एक्सरसाईज केली पाहिजे असं नाही, मात्र तुमची हेल्थ असो, कुठला आजार असो वा वजनावर नियंत्रण ठेवायचं असो, व्यायामाला कुठलाही पर्याय असू शकत नाही.
त्यामुळे एक सूत्र कायम लक्षात ठेवा, 75 टक्के डाएट आणि 25 टक्के एक्सरसाईज.
हे सूत्र तुमच्या आरोग्याची गाडी कायम रुळावर ठेवील.