दातांच्या साधारण समस्यांमध्ये दात किडणं, दात दुखणं, दात पिवळे होणं आणि हिरड्यांच्या समस्या याचा समावेश होतो. या समस्यांमध्ये वाढ झाल्याने दात कमकुवत होऊ शकतात. अशातच दात मजबुत करण्यासाठी तुम्हाला दातांच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावं लागेल. याचबरोबर काही पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्याने दात मजबुत होण्यास मदत होते. जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करणं ठरतं फायदेशीर...
कॅल्शिअम आणि फॉस्फरस आहे आवश्यक...
कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचा समावेश असणारं डाएट दातांसाठी उत्तम ठरतं. कारण ही दोन तत्व तोंडामध्ये अनहेल्दी अॅसिड तयार होण्यापासून रोखण्याचं काम करतात. अॅसिडिक फूड्स आणि लिक्विड दातांच्या एनामलचं नुकसान करतात. सध्या लोक सर्वात जास्त अॅसिडिक पदार्थ आणि याचा समावेश असणारे कोल्ड ड्रिंक्स यांचं सेवन करतात. ज्यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते. पनीर, दही, दूध आणि पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. फॉस्फरससाठी मांस, अंडी आणि मासे खाणं उत्तम ठरतं. हे सर्व पदार्थ एनामलच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात.
या पदार्थांच्या सेवनाने दात आणि हिरड्यांच्या समस्यांवर करता येतील उपचार :
अंडी
अंडी दातांचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं आणि ही दोन्ही तत्व दातांसाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असतं. जे कॅल्शिअम अब्जॉर्ब करण्यासाठी मदत करतात.
अवोकाडो
अवोकाडो दात हेल्दी ठेवण्यासाठी उत्तम आहार आहे. अवोकाडो प्रोबायोटिक्स फायबरने परिपूर्ण असतं. जे आरोग्याची पाचनक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात.
लसूण
लसूण शरीर आणि दातांसाठी फायदेशीर ठरतं. लसणामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं. जे अॅन्टीफंगल आणि अॅन्टीबॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण असतं. एलिसिन ओरल फ्लोरा इम्बॅलेन्सशी लढण्यासाठी मदत करतात. तसेच हे खराब बॅक्टेरिया नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तोंडामध्ये खराब बॅक्टेरिया कॅविटी आणि हिरड्यांचया समस्यांमुळे तयार होतात.
पालक
पालकमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असतं. हे व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व दातांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. दात हेल्दी आणि मजबुत करण्यासाठी पालकचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन व्यतिरिक्त पालकमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील ऑक्सीकरण एजंट्स हटवण्याचं कार्य करतात. अॅन्टीऑक्सिडंट दात आणि हिरड्यांसाठी उत्तम मानलं जातं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.