आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood Pressure), हृदयविकार (Heart Problem) असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेही रुग्णांच्या तब्येतीत चढ-उतार होतच असतात, पण उन्हाळ्यात आरोग्य टिकवायचे असेल तर काही टिप्स ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा कडक उन्हात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकणार नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूत आहारात बदल करावा, त्यांनी काय खावे ते जाणून (Summer Diabetes Diet) घेऊया.
1. पॅक केलेला ज्यूस -झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, उन्हाळ्यापासून आराम मिळवण्यासाठी अनेकजण टेट्रापॅक ज्यूस पितात. पण, त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे असे ज्युस पिणं मधुमेहींच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यावर ताज्या फळांचे रस घरी काढणे चांगला उपाय आहे, ज्यामध्ये नैसर्गिक साखर कमी असते.
2. फायबरयुक्त नाश्ता -मधुमेही रुग्णांनी दिवसाची सुरुवात योग्य आहारानं केली तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नाश्त्यामध्ये असे पदार्थ खाणे आवश्यक आहे, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असेल. असे केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. तुमच्या नाश्त्यामध्ये ओट्स, ओटमील, सफरचंद, बेरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा.
3. गोड फळं नकोत -उन्हाळ्याला आंब्याचा ऋतूही म्हटलं जातं, हा आंब्याचा हंगाम सर्वांनाच हवा-हवासा वाटतो. पण, आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्याने मधुमेही रुग्णांसाठी तो घातक ठरतो. याशिवाय अननस आणि कॅनटालूपपासून अंतर ठेवणे चांगले.
4. पाण्याची कमतरता -कडक ऊन, उष्ण वारा आणि आर्द्रता यामुळे उन्हाळ्यात शरीरातून भरपूर घाम येतो, त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा मधुमेही रुग्णांना पाण्याअभावी चक्कर येणे, अशक्तपणाचा सामना करावा लागू शकतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.