शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

फक्त वजनच कमी नाही, तर दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डाएटमध्ये करा 'हे' बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 5:29 PM

दिवसभर तुमची एनर्जी टिकून रहावी यासाठी काही खास पदार्थांचा (Energetic food items) समावेश करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणते आहेत याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

दिवसभर आपली एनर्जी टिकण्यासाठी सकाळचा नाश्ता (Breakfast full of energy) योग्यप्रकारे करणं गरजेचं आहे. धावपळीच्या जीवनशैली, रात्री झोप न होणं अशा बऱ्याच गोष्टींमुळे दिवसभर थकवा जाणवतो. अशात योग्य नाश्ता केला नसल्यास त्याचे आणखी दुष्परिणाम समोर येतात. त्यामुळेच, दिवसभर तुमची एनर्जी टिकून रहावी यासाठी काही खास पदार्थांचा (Energetic food items) समावेश करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणते आहेत याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ओट्स आणि ग्रीन टीडाएटिंग करण्यासाठी ओट्स (Oats) आणि ग्रीन टी (Green Tea) हे दोन पदार्थ मोठ्या प्रमाणावर सुचवले जातात. याला कारण म्हणजे, या दोन्ही पदार्थांमधून तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. ‘ग्रीन टी’मुळे थकवा दूर होतो, तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते. ओट्स तुमची सुस्ती दूर करते. ग्रीन टी तुम्ही दररोज एक कप, तसेच ओट्स तुम्ही दररोज एक बाऊल खाऊ शकता.

फळांचा करा समावेशनाश्त्यामध्ये फळांचा समावेश करणे भरपूर फायद्याचे ठरू शकते. विशेषतः केळी आणि संत्री (Banana and Orange benefits) या फळांचा समावेश तुमच्या नाश्त्यात असायलाच हवा. केळीमध्ये असणारे कार्ब्स हे तुम्हाला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा (Energetic diet) देतात. तर संत्र्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाणही मुबलक असते.

जेवणात करा या पदार्थांचा समावेशदुपारनंतरही तुमची ऊर्जा टिकून राहण्यासाठी जेवणात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये दही (Curd benefits) आणि पालक (Spinach benefits) यांचा समावेश होतो. रोज एक वाटी दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील सुस्ती दूर होण्यास मदत होते. दह्यामध्ये असणारे प्रोटीन तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा देते. तर, पालकच्या भाजीमध्ये असणारे आयर्न तुमच्या शरीराचे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. वेगाने फॅट बर्न करण्यासाठीही पालक फायदेशीर असते.

जेवणानंतर बडीशेप (Fennel health benefits) खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, मात्र बडीशेपमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात.

पाणी निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी (how much water should we drink) पिणे अत्यावश्यक आहे. मुबलक प्रमाणात पाणी पिल्यामुळे आरोग्याच्या कित्येक समस्या दूर राहू शकतात. पाण्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, आणि थकवा दूर होतो. अशा रितीने तुमच्या डाएटमध्ये थोडासा बदल करून, तुम्ही दररोजचा थकवा आणि सुस्ती दूर करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स