Drink water Tips : पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही. इतकंच नाही तर आपल्या शरीरात ७५ टक्के पाणी असतं. पण जर पाण्याचं हे प्रमाण असंतुलित झालं तर मोठ्या समस्या होतात. अनेक गंभीर आजार शरीरात घर करतात. एक्सपर्ट किंवा डॉक्टर नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण काही कारणाने अनेकांना हे शक्य होत नाही.
अशात जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. जी सामान्यपणे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे डायटिशिअन मनप्रीत यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांनी अशा पाच वेळा सांगितल्या आहेत जेव्हा तुम्ही पाणी आवर्जून प्यायला हवं.
पाण्याचं महत्व
आयुर्वेदात पाण्याला अमृत म्हटलं गेलं आहे. पाण्यामुळे शरीर स्वच्छ होतं. तसेच पाण्यातून शरीराला अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. या सगळ्या गोष्टी शरीरातील इतर अवयवांना फायदे देतात.
पाणी पिण्याची योग्य वेळ
पाणी पिणं महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण पाणी कधी पिणं जास्त महत्वाचं असतं हे अनेकांना माहीत नसतं. तेच जाणून घेऊया.
- सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच पाणी पिणं गरजेचं आहे. कारण रात्रभर तुम्ही पाणी पित नाही आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं.
- जास्तीत जास्त लोक ही चूक करतात की, ते जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवं असं मानलं जातं.
- आंघोल करण्याआधी पाणी प्यायलं पाहिजे.
- तसेच एक्सरसाइज करण्याआधी, एक्सरसाइज करताना आणि नंतर पाणी प्यायला हवं.
- डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या असल्यावर पाणी प्यावं. याने या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
पाणी कसं प्यावं
पाण्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे फायदे मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने पिणं महत्वाचं आहे. काही लोक उभं राहून पाणी पितात. ग्लासमध्ये घेऊन खाली बसून पाणी पिणं योग्य असतं. पाणी ढसाढसा पिऊ नये. ते एक एक घोट करून प्यावं.