Stomach Health : शरीरात पोट चांगलं राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर बरोबर असेल तर आरोग्य चांगलं राहतं. तुम्हालाही माहीत असेल की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासून सुरू होतात. अशात पोट नेहमी चांगलं ठेवणं आणि पोटाला अनुरूप असे पदार्थ खाणं महत्वाचं आहे. पोट, स्टमक अॅसिड, मोठी आतडी आणि छोट्या आतडी यांची काळजी घेतली पाहिजे. जर असं केलं नाही तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.
अशात डायटिशिअन श्वेता पांचाळ यांनी अशा 3 फूड्सबाबत सांगितलं आहे ज्यांमुळे पोट नेहमीच खराब राहतं. या फूड्समुळे तुम्हाला सतत ब्लोटिंग, गॅस, पोटदुखी, जुलाब किंवा अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. या समस्या झाल्या तर तुम्हाला बरं वाटणार नाही आणि रोजची कामेही बिघडतील.
हिरवी मिरची
डायटिशिअन श्वेता पांचाळ यांच्यानुसार, ज्या मिरच्यांचा रंग गर्द हिरवा असतो त्या पोटाचं खूप नुकसान करतात. जर तुमचं पचन तंत्र कमजोर असेल आणि तुम्हाला सतत अॅसिडिटीची समस्या होत असेल तर हिरव्या तिखट मिरच्यांनी तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात. अशात हिरव्या तिखट मिरच्यांचं सेवन कमी करा किंवा बंद करा.
चहा-कॉफी
जर तुम्हाला आधीच ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या असेल आणि त्यात तुम्ही चहा किंवा कॉफीचं सेवन केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. याने तुम्हाला पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टींनी झातीत जळजळ होणे, ब्लोटिंग, अॅसिडिटी अशा समस्या होतात.
हाय फॅटी फूड्स
आजकाल जास्तीत जास्त लोक बाहेरचं खूप काही खातात. यात मीठ आणि तेलाचं प्रमाण जास्त असतं. फ्रेंच फ्राइस, पिझ्झा, चीज खाल्ल्याने पोटात अॅसिड तयार होतं. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचन क्रिया कमजोर होते आणि मग पोट बिघडतं. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.