Sleeping Problem Reasons : आजकाल जास्तीत जास्त लोकांना रात्री झोप न येण्याची समस्या होते. पण लोक याचं कारण जाणून घेण्याच्या फंद्यातच पडत नाहीत. अशात ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते आणि त्यामुळे शरीरात इतरही अनेक समस्या घर करतात. जे लोकांना चांगलंच महागात पडतं. त्यामुळे झोप न येण्याची समस्या दूर करण्यासाठी आधी त्याची कारणे जाणून घेतली पाहिजे. जेणेकरून योग्य ते उपाय करता येतील.
अनेक लोकांना सकाळी झोपेतून उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यातील एक महत्वाचं कारण म्हणजे लोक आजकाल फोनचा खूप जास्त वापर करतात. स्मार्टफोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. सकाळी झोपेतून उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोन बघत असतात. ही सवय आरोग्यासाठी फारच घातक आहे. बरेच लोक रात्री झोपण्याआधी बराच वेळ फोन बघत असतात. या सवयीमुळे रात्री झोप न येणे आणि सकाळी फ्रेश न वाटणे या समस्या होतात.
झोपण्याआधी फोनच्या वापराने काय होतं?
बऱ्याच शोधांमधून हे समोर आलं आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर आरोग्यासाठी घातक आहे. याने रात्री झोप न येण्याची समस्या होते. एका रिपोर्टनुसार, रात्री झोपण्याआधी फोन पाहण्यावरून दोन जुळ्या बहिणींवर रिसर्च करण्यात आला होता. ज्यातून फार महत्वाची माहिती समोर आली. या रिसर्च दरम्यान एक बहीण रोज रात्री पुस्तक वाचून झोपत होती तर दुसरी बहीण फोन किंवा टॅबलेटचा वापर करत होती. दोघींच्या रिपोर्टसाठी एका ट्रॅकरचा वापर करण्यात आला होता. ज्यातून समोर आलं की, फोनचा वापर करणारी मुलगी झोप कमी घेत होती आणि दुसरी मुलगी चांगली आणि जास्त झोप घेत होती.
रिपोर्टमध्ये एका एक्सपर्टने सांगितलं की, फोनमधून येणाऱ्या प्रकाशाच्या व्हेव फार छोट्या असतात. त्याने हार्मोनमध्ये प्रभाव पडतो. ज्यामुळे झोपणे आणि जागण्याच्या रूटीनमध्ये अडथळा निर्माण होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर याने झोप कमी होते.
झोप न झाल्याने काय होतं?
एक्सपर्ट सांगतात की, चांगली झोप न घेतल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. अशात जर तुम्हाला रात्री झोपताना फोन बघण्याची सवय असेल तर याने तुमची काम करण्याची क्षमता कमी होईल. अशात तुम्हाला रूटीनमध्ये बदल करण्याची गरज आहे. एकतर फोनचा ब्राईटनेस कमी करा किंवा फोनचा वापर कमी करा.
सकाळी फ्रेश न वाटण्याची कारणे
- सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर याची फोनशिवाय इतरही काही कारणे आहेत. रात्री फोन पाहिल्याने याच्या प्रकाशामुळे झोपेसाठी महत्वाचं मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती शरीरात कमी होते. ज्यामुळे झोप येत नाही किंवा पूर्ण होत नाही.
- दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर दिवसभर भरपूर पाणी पित नसाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. भरपूर पाणी न प्यायल्याने शरीरात अमिनो अॅसिड कमी होतं. ज्यामुळे झोप प्रभावित होते.
- तसेच हार्मोन असंतुलित झाल्याने तुमची झोप खराब होते. कारण हार्मोन असंतुलित झाल्यामुळे मेटाबॉलिज्म कमजोर होतं. याचा सगळ्यात जास्त प्रभाव तुम्हाला तुमच्या झोपेवर दिसून येतो.