शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 4:21 PM

ही एक दाहक-विरोधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मात्र ही भाजी तुम्हाला डायबिटीजमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ते कसे पुढे जाणून घेऊया...

शेपूची भाजी अनेक आरोग्य फायद्यांनी समृद्ध असते. ही भाजी पचनक्रियेस मदत करते आणि पोटातील अतिरिक्त गॅस कमी करते. ही भाजी मासिक पाळीच्या विकारांपासूनही आराम देते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवते. ही एक दाहक-विरोधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मात्र ही भाजी तुम्हाला डायबिटीजमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ते कसे पुढे जाणून घेऊया...

डायबिटीजसाठी उपयुक्त आहे शेपूटाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी शेपूची भाजी अतिशय फायदेशीर मानली जाते. हे जगभरातील सर्व संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. खरं तर, ही भाजी आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवते. म्हणजेच फ्लक्सेशन नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकते. शेपूच्या मदतीने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवता येते. जी संसर्गाच्या काळात खूप महत्वाची असते. डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत. परंतु जर तुम्ही शेपूची भाजी खाल्ली तर त्याचा परिणाम काही दिवसात दिसून येतो. डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही भाजी कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही.

अशी खा शेपूची भाजीशेपूची भाजी तुम्ही कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. जास्त प्रमाणात लोक शेपू भाजीच्या स्वरूपातच खातात. मात्र तुम्ही शेपूचा ज्यूस बनवून देखील पिऊ शकता. चांगल्या चवीसाठी तुम्ही यामध्ये लिंबू किंवा पुदिनादेखील घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही शेपूची भाजी पराठ्यांच्या स्टफीनगमध्येही वापरू शकता. अशा पद्धतीने शेपू खाल्यास त्याची चवही चांगली आणि मुलंही ही भाजी आवडीने खातील.

शेपूच्या भाजीचे इतर फायदे

संधिवाताच्या वेदनेपासून आरामशेपूची भाजी दीर्घकाळापासून दाहक-विरोधी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते, याचा अर्थ ती संधिवात आणि संधिरोग यांसारख्या रोगांमध्ये जळजळ आणि संबंधित वेदना कमी करण्यास मदत करू शकते. शेपूची भाजी प्राचीन काळापासून नेमक्या याच कारणासाठी वापरली जात आहे.

हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतेशेपूची भाजी शरीरास पुरेसे कॅल्शियम देते, जे हाडांच्या नुकसानापासून बचाव करते. शेपूच्या भाजीमध्ये हाडांच्या खनिज घनतेच्या नुकसानीपासून संरक्षण देणारा एक महत्त्वाचा घटक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह