(Image credit-very well Health)
जर जेवणात मीठ कमी असेल तर जेवण फारसं चविष्ट लागत नाही. काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. पण कधी कधी नकळतपणे जेवणात मीठ कमी पडतं. आणि मग सगळ्यांना ताटात थोडं थोडं मीठ वाढायला लागतं. जेवताना पदार्थांत वरून मीठ टाकल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकतं. मीठ योग्य प्रमाणात सेवन केलं तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. अन्यथा जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागु शकतो. तर जाणून घ्या जेवणाच्या वरून जर मीठ घातलं तर कोणत्या समस्यांचा सामना करावा लागु शकतो.
(image credit- The telegraph)
अनेकदा कांदा काकडी, मुळा, खाताना आपण त्यावर मीठ घालून खातो. अश्या पध्दतीचं खाणं चवीला जरी चांगलं लागत असलं तरी वरून मीठ घेण्याची सवय महागात पडू शकते. आणि त्यांमुळे वेगवेगळे आजार होतात. मिठाच्या अतिरिक्त सेवनाने ह्दयाचे, किडनीचे किंवा नसांचे आजार होतात. उन्हाच्या दिवसात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर तहान लागते. अशा स्थितीत उन्हात फिरणाऱ्यांच्या शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते.
(image credit- open wide eat)
वृद्धांना त्यांच्या जेवणात मीठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अनेकदा जेवणात कमीच मीठ घातलं जातं. आणि त्यानंतर बाकीचे चवीनुसार मीठ जेवणात वरून वाढून घेतात. पण जेवणात असे वरून मीठ घेणे फार नुकसानकारक आहे. ही सवय मोडण्यासाठी जेवणातलं मीठाचं प्रमाण कमी करा. जेवणात वरून मीठ घेण्याची सवय सुटत नसेल. तर मीठाऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापर करु शकता. असे केल्यास तुमची मीठ घ्यायची सवय बंद होईल.
(Image credit -kids spot .com)
जेवणात वरून मीठ घातल्यास अनेक आजार होण्याचा धोका असतो. जेवणातील मीठात असलेलं आर्यन शरीरात सहज पचवता येतं. पण कच्च्या मीठाचं सेवन शरीरावर प्रेशर पाडतं. ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. मीठाचं अधिक सेवन केल्याने तहान कमी आणि भूक जास्त लागते. त्यामुळे जेवताना वरून खाल्ल्यास आजारांना निमंत्रण मिळते. हि वेळ टाळण्यासाठी जेवताना वरून मीठ घेणे टाळा.