Disadvantages Of Drinking Cold Water: सध्या उकाडा फारच वाढला आहे. त्यामुळे या दिवसात शरीर हाइड्रेट ठेवणं फार गरजेचं आहे. अशात बरेच लोक गरमी दूर करण्यासाठी फ्रिजचं थंड पाणी पितात. फ्रिजचं थंड पाणी तुम्हाला मानसिक समाधान देऊ शकतं, पण याने तुमच्या आरोग्याचं नुकसान होतं. चला जाणून घेऊ थंड पाणी पिण्याचे नुकसान...
पोट खराब होतं
थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होते. जेव्हा तुम्ही बाहेरून उन्हातून येऊन थंड पाणी पिता तेव्हा आतड्या आकुंचन पावततात. आतड्या आकुंचन पावल्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या होतात
हार्ट रेट होतो कमी
उन्हाळ्यात फार जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होऊ शकते. खूप जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते आणि यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो.
अन्न पचवण्यात समस्या
थंड पाणी प्यायल्याने आपल्या पचनक्रियेवरही वाईट प्रभाव पडतो. याचं कारण थंड पाणी प्यायल्यावर पोट टाइट होतं.
डोकेदुखीची समस्या
जास्त काळ थंड पाणी प्यायल्याने ब्रेन फ्रीजची समस्याही होऊ शकते. थंड पाणी पिण्यावर करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, थंड पाणी नसांमध्ये पोहोचलं की, मेंदुला एक संदेश देतं. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ लागते.
एनर्जी लेव्हल राहते डाउन
थंड पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म सिस्टीम स्लो होतं. ज्यामुळे शरीर फॅट योग्यपणे रिलीज करू शकत नाही. अनेक हे कमजोरी आणि थकव्याचं कारण ठरू शकतं.
कफ होण्याची समस्या
जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि याच कारणाने सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी सेवन करु नये. थोडं साधं पाणी प्यायल्यास समस्या होणार नाही.