(Image creadit : Womans Vibe)
दिवसभराचा थकवा आणि आळस यांमुळे आपण बऱ्याचदा सकाळी केसं धुणं टाळतो. आपल्यापैकी अनेक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी केस धुवून झोपण्याची सवय असते. परंतु तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यानं किंवा केस धुतल्यानं सर्दी, ताप यांसारख्या आजारांसोबतच शरीराशी संबंधित अनेक गंभीर आजारही होतात. तुमची ही एक चूक अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. जाणून घेऊयात ओले केस घेऊन झोपल्यामुळे आपण कोणत्या आजारांना आमंत्रण देत असतो.
इन्फेक्शन
जेव्हा तुम्ही ओले केस घेऊन झोपता. तेव्हा तुमचे ओले केस सरळ उशी आणि उशीच्या कव्हरच्या संपर्कात येतात. तसेच बऱ्याचदा केसांचं पाणी सुकवण्यासाठी ओला टॉवेल आपण डोक्याखाली ठेवतो. असं केल्यामुळं आपसूकच केसांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
मांसपेशींमध्ये वेदना
बऱ्याचदा आपल्याला अंगदुखी किंवा मानेच्या भागातील मांसपेशींना असह्य वेदना होतात. याचे मुख्य कारण म्हणजे ओले केसांनी झोपणं. ओल्या केसांमध्ये झोपल्यामुळे आपल्या मानेच्या आजूबाजूच्या पेशींना थंड तापमान जाणवते. त्यामुळे शरीराचे स्नायू आणि मानेच्या आजूबाजूचे स्नायू स्टिफ होऊन प्रचंड वेदना होतात.
हायपोथेरमीया
जास्त ठंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. जर तापमन खूप ठंड असेल तर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमचे केस टॉवेलने व्यवस्थित सुकवणे गरजेचे असते. तुम्ही केस पूर्णपणे सुकवून झोपलात तर या सर्व इन्फेक्शनपासून स्वतःचा बचाव करू शकता.
केसांमध्ये खाज येणं
ओल्या केसांमध्ये झोपल्यामुळे डोक्यातील त्वचेवर ओलावा राहतो. त्यामुळे केसांमध्ये खाज येते.
केस गळणे
ओले केस पटकन तुटतात. जर तुम्ही नेहमी ओल्या केसांनी झोपत असाल तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. ओल्या केसांची मुळं नाजूक होतात. यामुळेच केस गळण्याचे प्रमाण वाढते. ओल्या केसांनी झोपल्यामुळे केसांमध्ये गुंता होतो तसेच ते चिपचिपीत होतात. ज्या लोकांचे केस लांब आहेत त्यांनी ओल्या केसांमध्ये झोपणे टाळावे. नाहीतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केस गळतीचा त्रास होऊ शकतो.
डॅन्ड्रफ
ओल्या केसांमुळे डोक्यातील त्वचेतही ओलावा राहतो. तसेच डोक्यात असलेल्या सेबेशियस ग्लांड्सवरही परिणाम होऊन कमी किंवा जास्त तेल इत्पन्न होते. यामुळे डोक्यातील त्वचेचे पी.एच संतुलन बिघडते.
डोकेदुखी
ओल्या केसांनी झोपल्यामुळे डोकेदुखीची समस्या अनेकदा भेडसावते. सकाळी उठल्यावर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याचे मुख्य कारण अचानक तापमानात झालेला फरक असतो.