मेट्रो ब्लड बँकेसाठी आठवडाभरात तपासणी जिल्हा रुग्णालय : केंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी येणार
By admin | Published: January 14, 2016 11:59 PM
जळगाव : जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्या मेट्रो ब्लड बँकेची फाईल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे. ही फाईल मुंबई येथे पोहचली असून आठवडाभरात याची तपासणी (इन्स्पेक्शन) करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी येथे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील मंजुरी मिळाल्यानंतर ही मेट्रो ब्लड बँक सुरू होणार आहे.
जळगाव : जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्या मेट्रो ब्लड बँकेची फाईल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे. ही फाईल मुंबई येथे पोहचली असून आठवडाभरात याची तपासणी (इन्स्पेक्शन) करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी येथे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील मंजुरी मिळाल्यानंतर ही मेट्रो ब्लड बँक सुरू होणार आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने राज्यातील १० जिल्हा रुग्णालयांमध्ये मेट्रो ब्लड बँक उभारण्यात येत आहेत. यामध्ये जळगाव जिल्हा रुग्णालयाचाही समावेश आहे. त्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यासाठी लागणारे सर्व फर्निचर, वीज जोडणी पूर्ण झाली आहे.फाईर्ल मुंबईलामेट्रो ब्लड बँकेची संपूर्ण तयारी झाली. केवळ यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची मंजुरी बाकी आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने ही फाईल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली. ती पुढील कार्यवाहीसाठी नाशिक व तेथून मुंबई येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुढील आठवड्यात तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून फाईल मुबंई येथे गेल्यानंतर तेथून आता केंद्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (सीडीएससीओ) अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी (इन्स्पेक्शन) येणार आहे. त्यांनी येथील पाहणी केल्यानंतर त्यांचा अहवाल सादर होईल व त्यानंतर परवानगी मिळून मेट्रो ब्लड बँक सुरू होणार आहे. जळगाव आघाडीवरराज्य रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने राज्यात अशा मेट्रो ब्लड बँक उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जळगाव जिल्हा रुग्णालय या कामात आघाडीवर आहे. त्यामुळे लवकरच ही ब्लड बँक रुग्णांच्या सेवेत येऊ शकते. वाढीव सुविधेसाठी प्रयत्नजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्या मेट्रो ब्लड बँकेमुळे रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. या सोबतच ही बँक सुरू झाल्यानंतर येथे इतरही वाढीव सुविधा मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकरी डॉ. उमेश कोल्हे यांनी सांगितले. मेट्रो ब्लड बँकेची जागा व इतर सुविधा तर असणार, त्यासोबत याच जागेत इतरही सुविधा मिळाल्यास रुग्णांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.