सण उत्सव सगळ्यांसाठीच खास असतात. त्यातल्या त्यात दिवाळी म्हटलं की, फराळ आणि गोड धोड पदार्थ हे आलेच. कितीही नाही म्हटलं तरी गोड, चमचमीत खाण्याचा मोह आवरता येत नाही. 'थोडंस खाल्लं तर काही नाही होतं', असं म्हणत तेलकट, तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. परिणामी शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून डायबिटीसच्या समस्या, फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणं अशा आजारांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ खात असताना तब्येतीची कशी काळजी घेता येईल याबाबत सांगणार आहोत.
एका रिसर्चनुसार दिवाळीच्या काळात लोकांच्या शरीरातील साखरच्या पातळीत वाढ होते. सण उत्सवांच्या काळात 250 मिलीग्राम डीएलच्या वरील लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढ होते. ३०० मिलिग्राम डीएलच्या वर लोकांमध्ये १८ टक्के वाढ दिसून आली होती. खासकरून दिवाळीच्या दिवसात जास्तीत जास्त तेलकट, गोड पदार्थांचा आहारात समावेश केल्याने या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
जास्त न खाता प्रमाणात खा
जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाचवेळी खूप जास्त खाणं टाळा. दिवसातून ३- ४ वेळा ठराविक वेळेचे अंतर ठेवून काहीतरी खात राहा. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला पोषक तत्व मिळतील.
हेल्दी स्नॅक्स घ्या
दिवाळीच्या वेळी मिठाई, पेठे खाण्यापासून रोखणं खूप कठीण असतं. जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. गोड खावंस वाटल्यास तुम्ही ताजी फळं खाऊ शकतं तसंच जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.
गोड कमी खा
डायबिटीस असलेल्या लोकांनी असलेल्या दुधाच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खावे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते, ज्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. गोड पेयांचे सेवन करण्यापेक्षा शुगर फ्री पेय किंवा नारळाचे पाणी हा उत्तम पर्याय ठरेल.
...म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष
ब्राऊस राईस खा
अनेकांना पांढरा भात अधिक खायला आवडतं. कारण रोजच्या जेवणाचा तो भाग असतो. पण डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरे तांदूळ खाणे टाळावे. कारण त्या तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीची वाढ होते. म्हणून पांढर्या तांदळाऐवजी ब्राऊस राईस खायला सुरूवात करा. दिवाळीच्या निमित्ताने या भाताचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रण राहील.
तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नका
दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ तयार केले जातात. डायबिटीसच्या रुग्णांनी उत्सवाच्या वेळी , भजी, चकली यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय, बिस्किट्स, केक यासारखे बेकरी पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत. जेणेकरून वजन वाढण्यापासून तसंच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून बचाव करता येऊ शकतो. याशिवाय मादत पदार्थाचे सेवन शारीरिक संतुलन बिघण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. म्हणून दारू, सिगारेट अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नका.