Almond-Kidney Stone : लोक रोज बदाम वेगवेगळ्या प्रकारे खातात. कुणा भिजवलेले बदाम खातात, तर कुणी त्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जात. बदाम हे सगळ्यात शक्तीशाली ड्रायफ्रूट्सपैकी एक मानलं जातं. बदामातून भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि फायबर मिळतं. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तसेच बदाम हृदय मजबूत ठेवण्यासाठी आणि ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठीही फायदेशीर असतं.
मात्र, हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, बदाम अधिक खाल्ल्यानं किडनी स्टोनसारखी समस्या होऊ शकते. त्यामुळे बदाम खाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खासकरून अशा लोकांनी ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या राहिली आहे.
बदामामुळे वाढतो किडनी स्टोन
बदामात ऑक्सालेट हे तत्व असतं जे कॅल्शिअमसोबत मिळून किडनी स्टोन तयार करतं. त्यामुळे जर बदाम जास्त खाल्ले तर किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. खासकरून अशा लोकांमध्ये ज्यांना हाइपरऑक्साल्यूरियाची समस्या आहे. या स्थितीत लघवीत ऑक्सालेटचं प्रमाण अधिक असतं.
दिवसभरात किती बदाम खाऊ शकता?
काही रिसर्च सांगतात की, एक वयस्क व्यक्ती रोज २० ते २३ बदाम खाऊ शकतात. बदाम खाण्याचं हे प्रमाण वयस्क व्यक्तीसाठी सुरक्षित आहे. मात्र, किडनीची समस्या असलेल्या लोकांनी बदाम खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
आणखी कशामुळे होतो किडनी स्टोन?
केवळ बदामच नाही तर वेगवेगळे सोया प्रॉडक्ट्स, चॉकलेट, ओट, रेड किडनी बीन्स, नेवी बीन्स, पालक, केली आणि टोमॅटोनेही किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
किडनी स्टोनचा धोका कमी करण्याचा उपाय
किडनी स्टोनचा धोका कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रोज दिवसभरातून किमान २.५ लीटर पाणी प्यावं आणि मिठही कमी खावं. संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाण्यासोबत बदाम खाल्ल्यास किडनी स्टोनच्या समस्येचा धोका कमी केला जाऊ शकतो.