शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

काहीही करा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कधीच कमी होणार नाही वजन, हाच आहे सर्वात महत्वाचा मुद्दा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 6:28 PM

Weight Loss Tips : डाएट एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी वजनी कमी करण्यासाठी रात्रीची चांगली झोप का महत्वाची यावर काही सल्ले शेअर केले आहेत.

Weight Loss Tips : काही  लोकांसाठी वजन कमी करणं फारच अवघड असतं. लोक वेगवेगळे उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण बरेच लोक असे आहेत जे वजन कमी करण्याच्या प्रोसेसमधील महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अशात त्यांचं वजन काही केल्या कमी होत नाही. वजन कमी करण्याच्या प्रोसेसमधील महत्वाची बाब आहे पुरेशी झोप. 

डाएट एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी वजनी कमी करण्यासाठी रात्रीची चांगली झोप का महत्वाची यावर काही सल्ले शेअर केले आहेत. त्यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं की,  वजन कमी करण्यासाठी जेवढा आहार आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे तेवढीच झोपही महत्वाची आहे. एका हेल्दी व्यक्तीला रोज रात्री कमीत कमी 7 तासांच्या झोपेची गरज असते.

झोप मेंदूसाठी पोषक आहारासारखी असते. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला झोप आहार आणि व्यायामाइतकीच महत्वाची आहे. जर तुमचं टार्गेट फॅट कमी करणं असेल तर झोप सोडणं तुमच्यासाठी नुकसानकारक आहे'.

त्यांनी सांगितलं की, पुरेशी झोप न घेतल्याने वजन वाढू शकतं. ज्यामुळे तुम्हाला फॅट लॉस करण्यासाठी इतर कोणत्याही स्ट्रॅटेजीचा फायदा मिळत नाही. पुरेशी झोप घेतली नाही तर तणावाचे हार्मोन्स आणि भूक उत्तेजित होऊ शकते. ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.

- याच कारणाने कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिज्ममध्ये रूपांतर करण्याची शरीराची क्षमता कमी होऊ शकते आणि ग्लूकोजचं प्रमाणही याने वाढतं. ज्यामुळे शरीरात हाय इन्सुलिन आणि चरबी वाढते. त्या म्हणाल्या की, इन्सुलिन सेन्सिटिविटी 30 टक्क्यांपेक्षा अधिक कमी होते.

- रात्री पुरेशी झोप न घेतल्याने लेप्टिनचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेटची लालसा निर्माण होते. मग तुम्ही फास्ट फूड अधिक प्रमाणात खाता.

- तसेच कमी झोप घेतल्याने शरीराचा विकास करणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं. लवनीत यांनी सांगितलं की, 'अशाप्रकारे कमी झोप चुकीचे पदार्थ खाणं, भूक आणि कॅलरीचं प्रमाण वाढणं, शारीरिक हालचाल कमी होणं तसेच वजन वाढण्याशी जुळलेली आहे'.

झोपेच्या गुणवत्तेत सुधारणेबाबत लवनीत बत्रा यांनी सांगितलं की, लोकांनी झोपण्याआधी निळ्या प्रकाशापासून वाचावं. टीव्ही, मोबाइल झोपण्याआधी बघू नये. तसेच पुस्तक वाचावे, ध्यान साधना करावी. याने झोप चांगली येईल. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य