काजू खायला सर्वांनाच आवडतात. काजूचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. काजूमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक घटक आढळतात. तसेच, जर कोणाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तरी काजूमुळे ती बरी होते असंही म्हणतात.
काही लोकांच्या मते, जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वेगाने वाढतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काजू खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही. कारण काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात. तसेच शेंगदाणे आणि काजूमध्ये झिरो कोलेस्ट्रॉल असतं. रिसर्चनुसार, डाएटरी कोलेस्ट्रॉलचा शरीरावर विशेष परिणाम होत नाही.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी काजू फायदेशीर
काजूमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6, झिंक, प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काजू खूप फायदेशीर आहेत. काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात.
काजू वाढवतं गुड कोलेस्ट्रॉल
रिसर्चनुसार, काजू खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही तर गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. काजूमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे अनेक आजारांना दूर ठेवतात. काजू खाल्ल्याने ब्लड वेसल्सही बऱ्या होतात. त्यामुळे रक्त गोठण्याचा धोकाही वाढतो.
रोज काजू खाल्ल्याने बीपी, ट्रायग्लिसराइड लेव्हल आणि कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढण्यास मदत होते. काजू खाल्ल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. काजू हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. पण तरीही ते मर्यादीतच खाल्ले पाहिजे. दिवसभरात जास्त काजू खाल्ल्याने पोट खराब होऊ शकतं.
दिवसभर उत्साही वाटतं
रिसर्चनुसार, काजूमध्ये असलेले व्हिटॅमिन्स शरीरासाठी चांगले असतात. त्यात नॅचरल शुगर असते. महिलांनी काजू खाणं जास्त आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. काजूमध्ये आढळणार फायबर महिलांसाठी चांगले असते.