शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल करू नका! (बातमी जोड)

By admin | Published: July 26, 2015 11:38 PM

-कॅन्सरच्या मृत्यूची संख्या वाढली सहा टक्क्याने

-कॅन्सरच्या मृत्यूची संख्या वाढली सहा टक्क्याने
खा. दर्डा म्हणाले, कॅन्सरला खूप जवळून पाहिले आहे. कर्करोगाच्या वेदना काय असतात, त्या अनुभवल्या आहेत. यावर सर्वांनी मिळून काम करायला हवे. कारण याची आकडेवारी फार भयावह आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल आणि कॅन्सर रिसर्च इन्स्टट्यिूटच्या आकडेवारीनुसार २०१२ व २०१४ मध्ये कॅन्सरमुळे मरणाऱ्यांची संख्या सहा टक्क्याने वाढली आहे. २०१४ मध्ये ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच रोज साधारण १३०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू कॅन्सरमुळे होत आहे. २०१५ मध्ये साडेनऊ ते दहा लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, जगातील ३० टक्के कॅन्सरचे रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातही ३० टक्के रुग्ण हे डोके व मानेच्या कॅन्सरचेे आहे तर ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे बदलती जीवनशैली तसेच व्यसनांमुळे युवा वर्गात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
-शिक्षणात जीवघेण्या रोगांची माहिती द्यावी
खा. दर्डा म्हणाले, देशात मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर हे जीवघेणे आजार वाढत आहे. या आजाराच्या माहितीचा अंतर्भाव शिक्षणात केला तर त्यांच्यात जागृती होऊन व्यसनांचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील. ते व्यसनांपासून दूर राहतील व आजाराला प्रतिबंध बसेल.देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ३०० आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील ४० टक्के केंद्रामध्ये सोयी उपलब्ध नाहीत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ६०० अद्ययावत केंद्रांची गरज असून राष्ट्रस्तरावर कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करायला हवी, असेही ते म्हणाले.
या हॉस्पिटलसाठी आवश्यक बाबी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.
संचालन किशोर गलांडे यांनी केले तर आभार अशोक क्रिपलानी यांनी केले. कार्यक्रमाला आँकोलॉजी ॲण्ड रिसर्चचे संचालक डॉ. पूरविश पारेख, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, प्रसिद्ध ईएनटी सर्जन डॉ. मदन कापरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय काटे, डॉ. संगीता उगेमुगे, मनपा हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदुरकर, डॉ. बी. के. शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते.