आजकालच्या धावपळीच्या जीवनात जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाने हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून लोक कोरोनामुळे घरातच कैद झाले आहेत. छोट्या मोठ्या कामाशिवाय त्यांच्याकडे आवडीचे पदार्थ खाणं हेच काम शिल्लक राहिलं आहे. घरातच असल्याने अनेक लोक अनहेल्दी डाएट घेत आहेत. ज्यामुळे त्यांचं वजन वाढत आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी हलका आहार घेण्याचा प्रयत्न करतात. हे लोक डीनरला फार महत्व देत नाहीत. पण त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला सांगितले की, अनहेल्दी डीनरमुळेही वजन वाढतं. तुम्ही जेव्हा रात्री उशीरा जेवण करता आणि जेवण केल्यावर लगेच जाऊन झोपत असाल तर यापेक्षा मोठी चूक नाही. याने वजन जास्त वाढतं. डॉ. रंजना सिंह सांगतात की, झोपण्याच्या साधारण २ तास आधी रात्रीचं जेवण केलं पाहिजे. तसेच त्यांनी रात्री कोणते पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं तेही सांगितलं आहे. चला जाणून घेऊ वजन वाढवायचं नसेल तर रात्री कोणते पदार्थ खाऊ नये. (हे पण वाचा : चिंता वाढली! आणखी घातक होत आहे कोरोना व्हायरस, रूग्णांमध्ये दिसू लागलेत हे नवीन गंभीर लक्षणे!)
१) नूडल्स
डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी सांगितले की, जर तुम्ही रात्री नूडल्स खात असाल तर वेळीच ही सवय बंद करा. कारण यात असलेल्या कार्ब आणि फॅट्समुळे तुमचं आरोग्य धोक्यात येतं. यात फायबर अजिबात नसतं आणि या सर्व कारणांमुळे तुमचं वेगाने वजन वाढतं. जास्तीत जास्त लोकांचं याच कारणाने पोट बाहेर येतं.
२) चॉकलेट
डाएट एक्सपर्ट डॉ. सिंह यांच्यानुसार, चॉकलेटमध्ये कॅफीनसोबतच शुगरचं प्रमाण जास्त असतं. या गोष्टी तुमचं वजन वाढवण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतात. त्यामुळे डीनर झाल्यावर म्हणजेच रात्रीचं जेवण झाल्यावर चॉकलेट खाणं टाळावं. इतर वेळी तुम्ही चॉकलेट खाल तर त्याचे फायदेही होतात.
३) फ्राइड फूड
फ्राइड फूड म्हणजे तळलेले पदार्थ वजन वेगाने वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. तुम्ही पाहिलं असेल की, अनेक डॉक्टरही तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. फ्राइड फूडमध्ये कार्ब आणि फॅटी अॅसिड असतं. जे पोटातील अॅसिडीट आणि वजन वाढवण्याचं काम करतात. त्यामुळे प्रयत्न करा की, रात्री हलका आहार घ्या. जे सहजपणे पचेल.
४) सोडा
काही लोक रात्रीचं जेवण पचवण्यासाठी सोडा पिणं पसंत करतात. त्याची काही लोकांना सवयच असते. पण तुम्हाला माहीत नसेल की, यात हाय शूगर कंटेंट असतो. ज्याने बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे बरं होईल की, तुम्ही झोपण्याआधी सोडा सेवन करू नये.