शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

झोपताना संगीत ऐकता? वेळीच व्हा सावधान, 'हा' रिसर्च सांगतो याचे धक्कादायक तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 4:18 PM

तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी तर गाणी नाही ना? ऐकत असाल तर लगेच थांबवा कारण, एका संशोधनात असं समोर आलंय की, जे लोक झोपण्यापूर्वी गाणी ऐकतात (Listening to songs before going to bed) त्यांना झोप लागल्यानंतरही त्यांच्या मेंदूत ही गाणी सुरू राहतात.

संगीत ही फक्त आवड नसुन एक थेरपी आहे असं म्हटलं जातं. प्रत्येकजण आपला वेळ छान जावा या करीता त्यांच्या आवडीचं संगीत ऐकतात. पण संगीत ऐकण्याची तुमची वेळ कोणती? तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी तर गाणी नाही ना? ऐकत असाल तर लगेच थांबवा कारण, एका संशोधनात असं समोर आलंय की, जे लोक झोपण्यापूर्वी गाणी ऐकतात (Listening to songs before going to bed) त्यांना झोप लागल्यानंतरही त्यांच्या मेंदूत ही गाणी सुरू राहतात. गाणी ऐकत झोपल्यानं बाहेर गाणी बंद झाली तरी आपण झोपेत असताना आपल्या मेंदूमध्ये ही संगीताची प्रक्रिया बंद न होता सुरूच असते. रिपोर्टनुसार, संशोधनाचे निष्कर्ष 'सायकोलॉजिकल सायन्स' (Psychological Science) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

या संशोधनामागचा उद्देश काय?झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेतील बेलर विद्यापीठातील मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक मायकेल स्कलिन यांनी हे संशोधन केलं आहे. संगीताचा झोपेवर काय परिणाम होतो, हे शोधण्यासाठी त्यांनी हे संशोधन केलं. त्यांनी सांगितलं की, एके दिवशी रात्री अचानक त्यांची झोपमोड झाली होती. त्यानंतर त्याच्या डोक्यात संगीताचा तीच धून सुरू होती, जी त्यांनी झोपण्यापूर्वी ऐकली होती. त्यानंतर त्यांनी या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला.

याचे दुष्परिणाम काय?प्रोफेसर स्कलिन यांनी सांगितलं की, सर्वांना माहीत आहे की संगीत ऐकल्यानं छान वाटतं. ते म्हणाले की, विशेषत: तरुणांना झोपताना नियमितपणे संगीत ऐकण्याची सवय असते. परंतु, अनेकदा असं घडतं की, झोप लागल्यानंतरही संगीत मेंदूमध्ये सुरू राहतं. यामुळं झोप खराब होण्याची शक्यता असते, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

स्कलिन म्हणाले की, झोपेत असताना, आपल्या मेंदूत संगीत चालू राहतं. एका चाचणीच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला. त्यांनी सांगितलं की, अभ्यासात ५० लोकांचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान त्यांनी झोपण्यापूर्वी अनेक प्रकारचं संगीत ऐकलं आणि त्याचा झोपेवर होणारा परिणाम जाणून घेतला. त्यांनी सांगितलं की, यादरम्यान हे समोर आलंय की, जे लोक जास्त संगीत ऐकतात, त्यांची झोप खराब होऊ शकते. ते म्हणाले की, संगीत ऐकण्याची वेळही महत्त्वाची असते.

तज्ज्ञांची वेगवेगळी मतंझोपताना शांत सुरातलं संगीत ऐकणं चांगलं असतं, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. यामुळं मेंदूला शांतता मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील रात्रीच्या वेळी (रात्रीचे प्रहर) ऐकण्याचे राग मेंदूसाठी फायदेशीर असल्याचा अनेकांचा अनुभवही आहे. अनेक मंत्र आणि स्तोत्रेही शांत झोपेसाठी म्हटली जातात. निद्रानाशाच्या विकारामध्ये त्यांचा उपयोग होतो. शांत स्वरातील बासरीचे (flute) स्वरही मनाला शांतता देतात. या संगीतामुळं रात्रीच्या झोपेनंतर सकाळीही मनाला शांततेचा अनुभव येतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स