जेवणानंतर शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून खातो. परंतु काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्याने शरीराला धोकादायक (Side Effects of Reheating Foods) ठरतात, तसेच त्यांच्यातील पोषकतत्व नाहिसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले पाहिजे ते जाणून घेवूयात.
सेलेरी पुन्हा गरम करू नकासेलेरी (Celery) मध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते. जर तुम्ही ती दोन ते तीनवेळा गरम केली तर ती टॉक्सिक होते. हे टॉक्सिक शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.
बीट पुन्ह गरम करू नकाबीटची (beetroot) भाजी करत असाल तर ती पुन्हा गरम करू नका. यात नायट्रेट असते जे पुन्हा गरम केल्याने नष्ट होते.
भात पुन्हा गरम करू नकाएफएसएनुसार, भात (Rice) पुन्ह गरम करून खाल्ल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते.
मशरूम पुन्हा गरम केल्याने होते विषारीमशरूममध्ये (mushroom) प्रोटीन खुप जास्त असल्याने पुन्हा गरम केल्याने त्यांची संरचना बदलते. जे शरीरासाठी हानिकारक आहे.
पालकची भाजी पुन्हा करू नका गरमफ्रिजमध्ये ठेवलेली पालकची भाजी (palak vegetable) पुन्हा गरम करून खाणे टाळा यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यातील नायट्रेट तत्व पुन्हा गरम केल्याने हानिकारक होते. (Side Effects of Reheating Foods)
तेल करू नका वारंवार गरमएकच तेल (Oil) वारंवार गरम करून वेगवेगळे पदार्थ तळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान हृदयाचे होते. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते.
बटाटे वारंवार गरम केल्यास होईल हा आजारबटाट्याची (potato) शिल्लक राहिलेली भाजी दोन ते तीनवेळा गरम करून खाल्ल्यास शरीरासाठी खुप नुकसानकारक आहे. यामध्ये बॅक्टेरियामुळे बोटूलिज्म पॉयझन तयार होते. जे शरीराच्या नर्व्हजवर अटॅक करते. श्वास घेण्यास त्रास, मांसपेशीमध्ये पॅरालिसीस, इतकेच नव्हे तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.