Sleeping Tips : पुरेशी झोप आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मात्र, बिझी लाइफस्टाईल आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे लोकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कामाचा वाढता ताण, डिजिटल डिवाइसचा अधिक वापर आणि दिवसभराचा थकवा असूनही रात्री लवकर झोप लागत नाही. ज्यामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशात रात्री लवकर झोप लागण्याचे काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- श्वास घेण्याची पद्धत
ध्यान लावून बसणे एक असा अभ्यास आहे ज्यामुळे मनाला शांतता मिळते. झोपण्याआधी शांतपणे ध्यान लावून बसल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होतो. यामुळे मेंदुच्या नसाही रिलॅक्स होतात. ज्यामुळे लवकर झोप येण्यास मदत मिळते. अशात ध्यान लावण्यासाठी काय करावं ते जाणून घेऊ.
एका शांत ठिकाणावर बसा किंवा झोपा.
डोळे बंद करा आणि हळुवारपणे मोठा श्वास घ्या.
नाकाने मोठा श्वास आणि पोटात हवा भरा.
श्वासांवर लक्ष केंद्रीत करा आणि आपले विचार शांत करण्याचा प्रयत्न करा.
जर ध्यान लावताना डोक्यात विचार आले, तर त्याकडे लक्ष देऊ नका आणि श्वासांवर लक्ष केंद्रीत करा.
ही क्रिया कमीत कमी ५ ते १० मिनिटे करा.
ध्यान केल्याने झोप चांगली येते, मन शांत होतं आणि तणावही कमी होतो. ज्यामुळे तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारते.
- डिजिटल डिवाइसपासून दूर रहा
आजकाल झोपण्याआधी लोक नेहमीच मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर वेळ घालवतात, ज्यामुळे झोपेवर वाईट प्रभाव पडतो. मोबाईल आणि लॅपटॉपच्या ब्लू लाईटमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. या लाईटमुळे मेलाटोनिन हार्मोन रिलीज होतात, ज्यामुळे झोपेत अडथळा येतो. अशात झोपण्याच्या ३० मिनिटांआधी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही बंद करा. इतर काही गोष्टींमध्ये व्यस्त रहा. जसे की, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे किंवा संवाद साधणे. याने डोळे आणि मेंदुला आराम मिळेल व तुम्हाला चांगली झोप येईल.
या उपायांनी काय होईल?
या दोन्ही उपायांचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की, हे नॅचरल आणि सुरक्षित आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास मेंदू आणि शरीर हळूहळू झोपेसाठी तयार होतं. यामुळे झोप न येण्याची समस्या दूर होते आणि तुमची झोपही पूर्ण होईल.