- नितांत महाजनगॉसिप तर काय आपल्यापर्यंत येतातच. त्यात आपण वाचतो की करीना कपूरची जिम पार्टनर अमूकतमूक आहे. शाहीद कपूर आता बायकोचा जिम पार्टनरही झाला आहे. रणवीर कपूरचा जिम पार्टनर अमूकतमूक आहे नी काय काय. आपल्याला प्रश्न पडतो की लागतो कशाला हा जिम पार्टनर? त्याचा काय उपयोग? आपण कुठून आणायचा? कोण असेल आपला पार्टनर? मुळात आपल्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं मिळून लावलं जिम तर आपण सोबत जावू रोज की दांड्याच मारु? मुळात आपला जिम पार्टनर म्हणून जो कोणी असेल त्याचा आपल्याला उपयोग होइल की, तो त्रासच देईल आपल्याला?यासगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यापूर्वी हे माहिती करुन घ्या की, चांगल्या जिम पार्टनरचा उपयोग काय? का हवा तो आपल्यासोबत?१) प्रेरणाएकतर आपल्यासोबत कुणी आहे, ती व्यक्ती आपल्याला प्रेरणा देते आहे तर आपण एखादं काम अधिक उत्साहानं करतो. त्यात व्यायामाचा अनेकांना मनस्वी कंटाळा. रोज रोज तेच ते करुन कंटाळा येतो. मात्र सोबत चांगला जिम पार्टनर असेल तो आपल्याला मोटिव्हेट करत असेल तर मात्र आपलं जिम उत्साहात बरेच दिवस सुरु राहतं.२) गंम्मत आणि मज्जाहीहोतं काय व्यायाम बोअर होतं. रोज व्यायाम करायची सवय नसल्यानं जे आपण करतोय त्यात काही मजा वाटत नाही. त्यात वजनाचे आकडे, मसल्स पॉवर काही एका दिवसात वाढत नाही, की बदलत नाही. कुणी सोबत असेल तर हसतखेळत, मौजमजा करत, आपल्या चुकांचेही किस्से सहन करत व्यायाम पार पडतो.३) टार्गेटचांगल्या मित्रांमध्येही हेल्दी स्पर्धा होवू शकते. एकमेकांशी स्पर्धा करत, एकमेकांना टार्गेट देत जिम पार्टनर व्यायामाला उत्तम हेल्दी मदत करु शकतो. त्यातून आपला स्टॅमिना वाढतो, आपण थोडं जास्त रेटतो स्वत:ला.४) फुकट पर्सनल ट्रेनरतुमचा मित्र जर व्यायामप्रेमी असेल, त्याला व्यायामाची आवड असेल, तो आधीपासून व्यायाम करत असेल तर एक फुकट पर्सनल ट्रेनर आपल्याला मिळतो. तो आपल्याला फुकटात गाईडही करतो. ५) आपले मित्रपण बारीक आणि स्टायलिशआपणच नाही तर आपले मित्र पण बारीक होतात. स्टायलिश होतात. आपल्या अवतीभोवतीचे विषय बदलतात. वातावरण बदलतं आणि व्यायाम आणि फिटनेस हा आपल्या चर्चेत, आपल्या जगण्यात फ्रण्ट सिट घेतात.६) नकारात्मकता संपतेजे मित्र काहीच करत नाहीत, त्यापेक्षा जे मित्र कृती करुन बदल घडवतात.असे मित्र आपल्या अवतीभोवती वाढल्यानं, त्यातला एक आपल्याला व्यायामात साथ देत असल्यानं आपण कृतीशील होतो. नकारघंटा बंद होते आणि जे जे शक्य ते ते करु ही नवी वृत्ती आपण शिकतो. त्याचा आपल्याला जगताना फार उपयोग होतो.
करीना कपूरसारखा ‘फीट’ जिम पार्टनर आहे का तुमचा?-हे वाचा
By admin | Published: June 09, 2017 7:11 PM