आपणात कुशाग्र बुद्धिमान होण्याची "ही" लक्षणे आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2017 9:40 AM
आज प्रत्येकजण यश मिळण्यासाठी धडपळ करीत असतो. परंतु प्रत्येकालाच यश मिळत नाही. मात्र जो बुद्धिचा सकारात्मक आणि योग्य वापर करुन स्मार्टवर्क करतो, त्यालाच यश मिळते.
आज प्रत्येकजण यश मिळण्यासाठी धडपळ करीत असतो. परंतु प्रत्येकालाच यश मिळत नाही. मात्र जो बुद्धिचा सकारात्मक आणि योग्य वापर करुन स्मार्टवर्क करतो, त्यालाच यश मिळते. विशेष म्हणजे हा स्मार्टनेस व्यक्तीमध्ये सहज येत नाही. विलक्षण बुद्धिमत्तेसाठी काही विशेष गोष्टींचा अवलंब करावा लागतो. जे काम आपण हाती घेतो त्याला इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करावे लागते. यानंतरच आपली ओळख कुशाग्र बुद्धिमान म्हणून होते. * काय आहेत कुशाग्र बुद्धिमान लोकांची लक्षणे :बुद्धिमान लोक बहुतांश वेळ वाचनात किंवा शिकण्यात घालवतात. इंटरनेटवरची अद्ययावत माहिती ते नेहमी एकत्र करीत असतात. असे लोक रात्री उशीरापर्यंत काम करतात. त्यांचा स्वभाव हा मनमोकळा असतो तसेच त्यांचे विचार खुले असतात व परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यांच्या डोक्यात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रश्न येत असतात. आणि हे प्रश्न ते निर्भिडपणे विचारतात. प्रश्न विचारतानाही ते विचारपूर्वकच विचारतात. तशी क्षमता त्यांच्यात असते. ते आपल्या चुकांपासून शिकतात. शिवाय ते कोणत्याही विषय किंवा मुद्द्यावर आपले अज्ञान स्वीकारतात. बोलतानाही ते पुराव्यांच्या आधारे बोलतात. भावनेच्या आधारे नव्हे. विशेष म्हणजे त्यांच्यात सहानुभूतीची भावना अधिक असते.