Garlic Types : लसणाचा वापर जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये केला जातो. याची टेस्ट आणि सुगंध फार गर्द असतो. याने पदार्थाला एक वेगळीच टेस्ट येते. त्यामुळे जास्तीत जास्त लोक सगळ्याच डिशमध्ये याचा वापर करतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लसूण हा कांद्याच्या फॅमिलीतीलच आहे आणि याचे अनेक प्रकारही असतात. चला जाणून घेऊ लसणाचे चार प्रकार....
पांढरा लसूण
पांढरा लसूण हा सगळ्यात कॉमन लसूण आहे. जो बाजारात सगळ्यात जास्त विकला जातो. या लसणाच्या गाठ्यात अनेक आकाराच्या कळ्या असतात. सगळ्यात मोठ्या आकाराच्या कळ्या वरच्या बाजूला असतात. या लसणाची लागवड सोपी असते आणि ताजा लसूण टेस्टसाठी डार्क असतो.
जांभळ्या रंगाचा लसूण
या प्रकारच्या लसणाचा वरचा भाग म्हणजे साल जांभळ्या रंगाची असते. पण आत लसणाचा रंग पांढराच असतो. या लसणाची गाठी जरा टणक असते. या लसणाच्या गाठ्यातील कळ्या जवळपास एकाच आकाराच्या असतात. जांभळ्या लसणाच्या कळ्या जास्तीकरून रसदार असतात आणि पांढऱ्या लसणाच्या तुलनेत टेस्टही जास्त डार्क नसते. याप्रकारचा लसूण सामान्य बाजारात कमी बघायला मिळतो.
काळा लसूण
काळ्या लसणापासून तयार अनेक पदार्थ तुम्ही अनेक रेस्टॉरन्टमध्ये बघितले असतील. पारंपारिक पदार्थ आणि पारंपारिक औषधांमध्येही याचा वापर अनेक वर्षापासून केला जातो. काळा लसूण तयार केला जातो. एक साधा लसूण काही महिने ठेवला तर त्याचा रंग काळा होतो. या प्रोसेसला मायलार्ड रिअॅक्शन म्हणतात.
गुलाबी लसूण
गुलाबी लसणाला गावराणी लसूणही म्हणतात. याच्या कळ्या गुलाबी असतात आणि कळ्या लहानही असतात. गुलाबी लसूण फार उष्ण आणि तिखटही असतो. याच्या कळ्या रसदार आणि कुरकुरीत असतात. पण सामान्य लसणाच्या तुलनेत कमी चिकट असतो. हा लसूण कोणत्याही डिशमध्ये वापरला जात असतो. यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॉपर, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह आणि जस्तही असतं.
यातील कोणता लसूण बेस्ट
रंग कोणताही असो सगळ्या प्रकारचा लसूण आपल्या आरोग्यासाठी गरजेचा असतो. कोणताही लसूण वेगवेगळ्या डिशमध्ये वापरला जातो. जर यांची तुलना केली तर जांभळ्या रंगाचा लसूण सगळ्यात जास्त रसदार असतो आणि याची टेस्टही जास्त डार्क नसते. त्यामुळे याचा पदार्थात सहजपणे वापर करता येतो. याने पदार्थाला वेगळी टेस्ट मिळते. यामुळेच हा लसूण इतर लसणापेक्षा वेगळा ठरतो. सामान्यपणे पांढरा लसूण सगळ्यात जास्त वापरला जातो आणि चांगला मानला जातो.