(Image Credit : behealthy.today)
चेहऱ्याचा नॅच्युरल ग्लो कमी होत असल्याची समस्या अनेकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे बाजारातील महागडी उत्पादने वापरुन चेहऱ्यावर ग्लो आणला जातो. पण बाजारातील उप्तादनांवर हजारों रुपये खर्च करण्यापेक्षा केवळ पाण्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. यासाठी तुम्हाला वॉटर थेरपीचा आधार घ्यावा लागेल. त्यासोबतच या थेरपीने अनेक आजारांनाही दूर ठेवता येतं.
वॉटर थेरपीचे फायदे
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डॉक्टरही नेहमी दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी जर ३ ते ४ ग्लास पाणी प्यायला हवं. रिकाम्या पोटी पाणी पिण्याला वॉटर थेरपी म्हटले जाते. याने आरोग्य तर चांगलं राहिलंच त्यासोबतच याने त्वचेसंबंधीही अनेक फायदे आहेत.
त्वचेवर चमक
त्वचेला चमकदार करण्यासाठी वॉटर थेरपी सर्वात फायदेशीर मानली जाते. पण ही थेरपी नियमीत केल्यासच याचा फायदा दिसेल. अनेकजण काही दिवस ही थेरपी करुन सोडून देतात. पण तसे करुन फायदा होणार नाही. याने अनेक आजारांपासूनही सुटका मिळते.
विषारी पदार्थ बाहेर काढणे
मानवाच्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. पण तरीही शरीर फिट ठेवण्यासाठी नियमीत योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं. यामुळे पोटासंबंधी आजार होत नाहीत. जास्तीत जास्त विषारी पदार्थ शरीरातून बाहेर गेल्यास शुद्ध रक्ताची निर्मिती अधिक होते.
त्वचा हायड्रेटेड राहते
पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराची एनर्जी वाढते. तसेच चांगल्याप्रकारे हायड्रेटेड शरीर नेहमी आजारांना दूर ठेवतं. त्यामुळे शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे फायद्याचे ठरते.
खालील आजारांवर वाटर थेरपी प्रभावी
डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, संधीवात, ह्दयाचे जलद ठोके, मिर्गी-अपस्मार, लठ्ठपणा, दमा, टीबी, मेंदुच्या बाहेरील दाह, किडनी, मुत्राशयाचे आजार, उलट्या, जठराची सूज, जुलाब, अपचन, मूळव्याथ, मधूमेह-डायबेटीस, बद्धकोष्ठता, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कॅन्सर, मासिक पाळींचा आजार, कान-नाक आणि घशाचा आजार यावर जलशुद्धीकरण पद्धती प्रभावी ठरली आहे.
अशी सुरू करा 'वाटर थेरपी'
१) सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी कमीत कमी अर्धा लीटर पाणी प्या. मात्र त्याचं प्रमाण एकावेळेस ६०० मिलीपेक्षा जास्त ठेऊ नका. हे प्रमाण पहिल्या दिवसापासून हळूहळू वाढवा, म्हणजे पहिल्या दिवशी एक ग्लास, तिसऱ्या दिवशी दोन ग्लास याप्रमाणे.. पाण्यात फ्लुओराईडचं प्रमाण नको, पाण्यात फ्लुओराईडचं नाही याची खात्री करा, म्हणजेच शुद्ध पाण्याचा वापर करा.
२) पाणी प्यायल्यानंतर ४५ मिनिटांनी ब्रश करा, तोंड धुवा. त्यानंतर मात्र आणखी ४५ मिनिटांचा अवकाश ठेवा.
३) यानंतर ४५ मिनिटांनी तुम्ही नाश्ता करू शकतात.
४) नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यानंतर लगेच पाणी पिऊ नका, प्रत्येक वेळी पाणी २ तासानंतर प्या.
५) हे दररोज करा, शून्य पैशात तुमची वाटर थेरपी ट्रीटमेंट सुरू झाली आहे असे समजा.
६) जे इतर आजारांवर उपचार घेत असतील, त्यांनी ही थेरपी त्या दरम्यान केल्यास त्यांना फायदा होईल, मात्र त्यांनी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.