नितांत महाजनहाय हिल्स घालणं, त्यातलं स्टाइल स्टेटमेण्ट. त्यानं चांगलं दिसणारं पोश्चर, दुखणाऱ्या टाचा, मिळणारा रुबाब, किंवा कंबरदुखी, हिल्स घातल्यानं कोण कसं स्टायलिश दिसतं, हिल्स आऊट आॅफ फॅशन, हिल्स इज फॅशनेबल अशी कितीतरी उलटसुलट चर्चा आपण वाचतो, ऐकतो. पेन्सिल हिल्स, पॉईण्टर हिल्स, प्लॅटफॉर्म हिल्स असे अनेक प्रकार तरीही मुली वापरतातच. पण हा सारा विषय मुलींपुरताच असतो. मुलींच्या फॅशन्सभोवतीच फिरतो. पण कुणी आपल्याला येवून असं सांगितलं की हिल्सचा जन्म सुरुवातीला पुरुषांच्या पायतणांसाठीच झाला तर आपण विश्वास ठेवू का? पण हे खरं आहे, अलिकडेच कॅनडातल्या टोराण्टो शहरातल्या म्युझिअममध्ये भरलेल्या एका प्रदर्शनात ही माहिती समोर आली.
कोणे एकेकाळी हाय हिल्स फक्त पुरुषच वापरत हे माहितीये?
By admin | Published: June 24, 2017 1:19 PM