Benefits of Banana Peels: केळी हे फळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. वजन वाढवणं असो वा फायबर मिळवणं असो पोटासंबंधी अनेक समस्या दूर करणं असो केळी खाणं फायदेशीर ठरतं. पण जास्तीत जास्त लोक केळी खाऊन त्याची साल फेकून देतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, केळीसोबत केळीच्या सालीपासूनही अनेक फायदे मिळतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, केळी आणि त्याची साल दोन्हीचे वेगवेगळे फायदे मिळतात. केळीच्या सालीपासून हेल्दी स्नॅक्स आणि मिठाई बनवली जाऊ शकते. केळीच्या आतील भाग नरम आणि गोड असतो. तर केळीची साल थोडी जाड आणि कडवट असते. केळी जेवढी पिकलेली असेल त्याची सालही तेवढी गोड आणि मुलायम असते. केळीवर अनेक केमिकल्सचे फवारे मारले जातात. त्यामुळे केळीची साल खाण्याआधी ती चांगली धुवून घ्यावी. नाही तर त्याने नुकसान होऊ शकतं.
केळीच्या सालीचे 5 मोठे फायदे
1) केळीच्या सालीमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, शुगर, फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, कॅल्शिअम आणि आयरनसोबत भरपूर पोषक तत्व असतात. याचं सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि यांची कमतरता होत नाही. पोषक तत्व शरीर मजबूत करण्यासाठी गरजेचं असतात.
2) केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असतं, ज्याने मूड डिसऑर्डर आणि डिप्रेशनपासून आराम मिळतो. ट्रिप्टोफॅन शरीरात जाऊन सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होतं, ज्याने तुमचा मूड चांगला होता. सालीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी6 ने झोपेत सुधारणा होते, मूड चांगला होता.
3) केळीच्या सालीमध्ये फायबर भरपूर असतं, ज्याने डायजेशनसंबंधी समस्या दूर होते. बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या रूग्णांनी केळीची साल खाल्ली पाहिजे. क्रोहन डिजीज आणि इरिटेबल बाउल सिंड्रोमच्या रूग्णांसाठीही केळीची साल फार फायदेशीर मानली जाते.
4) डोळे हेल्दी ठेवण्यासाठी केळ्या सालीचं सेवन केलं पाहिजे. केळीच्या सालीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए ने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि डोळे मजबूत होतात. हे व्हिटॅमिन केळी आणि केळीच्या सालीमध्ये भरपूर असतं.
5) केळीच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स, कॅरोटीनॉयड आणि इतर एंटीऑक्सिडेंट भरपूर असतात. कच्च्या केळीची साल खाल्ल्याने तुमच्या एंटीऑक्सीडेंट लेव्हल वाढते आणि कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.