भाज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा लसूण आरोग्यासाठी फायद्याचा आहे. याचे आरोग्यदायक फायदे माहीत असणारे लोक अनेकदा आपल्या बिछान्याखाली लसूण घेऊन झोपतात. अनेकदा सतत आजारी असणाऱ्या लहान मुलांच्या बिछान्याखालीही लसून ठेवले जाते. वेगवेगळ्या आजारांवर लसूण रामबाण उपाय मानला जातो. चला जाणून घेऊया याचे अनेक फायदे.
रिकाम्या पोटी लसूण खावी
रिकाम्या पोटी लसूण खाणं अधिक फायदेशीर असतं. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. तसेच ज्यांना टिबीचा त्रास आहे, त्यांना त्याचा अधिक फायदा होईल. ऍसिडीटी आणि डायरिया सारख्या आजारांना लसूण हा एकमेव उत्तम उपाय आहे.
लसणामुळे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये
लसणामुळे उच्च रक्तदाब देखील कमी होतो. तसेच लसूणमध्ये असलेले एलीसिन तत्व रक्तचापाला कमी करतात. तसेच इतर दृदयाशी संबंधित आजार देखील कमी करतात. लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयु्क्त गूण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. ऍन्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. लसणात अँटीबॅक्टेरियल गूण आहेत. म्हणूनच तारुण्यपिटीकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपिटीकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.
लसणामुळे त्वचेचे आजार बरे होतात
लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा ऍथलिट फुट यासारख्या आजारांवर लसूण गुणकारी आहे.
लसणामुळे डास चावत नाहीत
दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाही. तसेच त्वचाही नितळ होते.