केळी खाल्यानंतर त्याची साल कुणीही फेकून देतं. केळी खाण्याचे अनेक फायदेही तुम्ही ऐकले असतीलच. पण केळीच्या सालीचे फायदे मात्र अनेकांना माहीत नसतात. ज्याप्रमाणे केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत तसेच केळीच्या सालीचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया....
हे व्हिटॅमिन्स मिळतात
केळीच्या सालीवर ज्या पांढऱ्या रेषा असतात त्यात व्हिटॅमिन बी६, बी१२, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट आढळतात. हे व्हिटॅमिन त्वचा आणि वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे यापुढे केळीची साल फेकण्याआधी विचार कराल.
मोस करा दूर
केळीच्या सालीने मोस झालेल्या ठिकाणी घासले तर मोस दूर करण्यास याने मदत मिळते. त्यासोबतच नवीन येणाऱ्या मोसही येत नाहीत.
सुरकुत्यांपासून सुटका
केळीच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. याने त्वचेवरील सुरकुत्या घालवल्या जातात. केळीच्या सालीने सुरकुत्या असलेल्या त्वचेवर घासा, त्यानंतर पाण्याने ती जागा स्वच्छ करा. काही दिवस असे केल्याने तुम्हाला फरक दिसेल.
चमकदार दात मिळवा
केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज आढळतात, जे तुमच्या दातांचा पिवळेपणा आणि इतर डाग दूर करतात.
पिंपल्सपासून सुटका
जर तुम्हाला सतत पिंपल्सची समस्या होत असेल तर केळीची साल तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज अधिक प्रमाणात असतात. केळीची साल पिंपल्सवर हलक्या हाताने घासल्यास याचा फायदा दिसून येईल.