आपण दररोज आंघोळ करताना साबण वापरतोच. अनेकजण अनेक विविध प्रकारचे साबण वापरतात. अनेकांना माहित नसते की कोणता साबण आपल्या त्वचेसाठी योग्य आहे. अनेकदा साबण वापरण्याच्या चुकीच्या सवयीचे आपल्याला घातक परिणामही भोगावे लागतात. डर्मिटोलॉजिस्ट डॉ. देवेश मिश्रा यांनी साबण वापरण्याच्या चूकीच्या सवयींवर प्रकाश टाकत साबण वापरण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत. ओन्लीमाय हेल्थ या वेबसाईटला त्यांनी ही माहिती दिली आहे.
साबण वापरण्याची योग्य पद्धती
- डॉ देवेश यांच्या म्हणण्यानुसार साबण शरीराच्या खालच्या भागापासून वरच्या भागाला लावला पाहिजे. आपल्याला शरीराच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत साबण लावण्याची सवय असते पण ती चूकीची आहे.
- साबण थेट त्वचेवर चोळण्याएवजी आपण बाजारात मिळत असलेल्या सॉफ्ट ब्रशचा उपयोग करु शकता. यामुळे साबणाचा तुमच्या त्वचेशी थेट संपर्क येणार नाही.
- साबणाचा जास्त फेस काढणं योग्य नाही. साबणाचा जास्त फेस काढल्यामुळे शरीराला त्याचे नुकसान भोगावे लागू शकते.
- साबणाने हात कमीतकमी २० सेकंद धुवा.
- साबण कमी केमिकल्स असलेला आणि माईल्ड असलेला वापरा. यामुळे सेन्सेटीव्ह त्वचेला त्याचा धोका होत नाही.
- साबण सुका करून ठेवावा. साबणात पाणी राहीले तर साबणाला मॉईश्चर पकडते आणि साबणावर जंतू निर्माण होतात.
- साबण तुम्ही तीन तुकडे करून तुकड्या तुकड्यांमध्ये वापरू शकता.
- असं म्हटलं जात की लीक्वीड सोप अँटीबॅक्टेरिअल असतो. ते जरी योग्य असले तरी लीक्वीडसोप ठेवण्याचे भांडे आणि पंप वेळोवेळी धुवुन घ्या कारण त्यातच बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता असते.
चेहऱ्याला साबण लावावा का?साबण चेहऱ्याला लावल्याने चेहरा कोरडा पडण्याची शक्यता असते. तसेच जास्त केमिकलयुक्त साबण लावल्याने त्वचेला अॅलर्जी होते. त्या एवजी नैसर्गिक फेसवॉश वापरावा ज्यामुळे तुमच्या त्वचेला अपाय होणार नाही.