- मयूर पठाडेतुम्ही तुमच्या आहाराविषयी, फिटनेसविषयी अति जागरूक आहात, कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वाढणार नाही, याकडे तुम्ही कटाक्षानं लक्ष देताहात.. चांगलीच गोष्ट आहे. पण काही गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण या छोट्या छोट्या गोष्टीच नंतर मोठ्या होतात आणि तुमच्या निश्चयावर आणि तुम्ही करीत असलेल्या कष्टांवर पाणी फेरतात.बºयाच जणांना सवय असते, जेवताना टीव्ही पाहायची किंवा टीव्ही पाहात जेवण करायची. त्यांना वाटतं, यामुळे आपण एकाच वेळी दोन गोष्टी साध्य करतो. आपलं जेवणही होतं आणि टीव्ही, बातम्या पाहायला एरवी जो वेळ मिळत नाही, तो वेळही यानिमित्तानं काढता येतो. काही जण जेवताना टीव्हीला डोळे लावून बसतात, तर काही जण मोबाइलला. जेवता जेवता व्हॉट्स अपचे मेसेजेस पाहून होतात, काही जणांना रिप्लाय देऊन होतो.. आणखी एक तिसरा प्रकार म्हणजे आॅफिसात काही जण आपल्या टेबलावरच जेवण करतात. एकीकडे आपल्या समोर डेस्कटॉप किंवा लॅपटॉप सुरू असतो आणि ते पाहात पाहात दुसरीकडे जेवणही सुरू असतं.अभ्यासकांचं म्हणणं आहे, तुम्ही जर असं काही करत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे आपण किती खातोय, काय खातोय याकडे आपलं लक्ष राहात नाही, त्यावर कंट्रोल राहात नाही आणि त्यामुळे पचनाच्या आणि वजनवाढीच्या समस्याही उद्भवतात. बºयाचदा गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचं आणि सेवन करतो. आपल्या वेटलॉसच्या निर्णयातला आणि त्याचा फायदा मिळवण्याच्या इच्छेतला हा सर्वात मोठा अडथळा असतो.त्यामुळे जेवताना कुठल्याही स्क्रीनसमोर तुम्ही बसत असाल, तर त्या प्रकाराला, सवयीला आधी आळा घाला.. कारण तुमच्या पचनापासून ते तुमच्या डोळ्यांपर्यंत आणि तुमच्या लाइफस्टाईललाही ते घातक आहे.
टीव्ही, मोबाइल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून तुम्ही जेवण करता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:34 PM
..मग तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढणारच..
ठळक मुद्देकुठल्याही स्क्रीनसमोर बसून जेवण करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.त्यामुळे आपण किती खातोय, काय खातोय याकडे आपलं लक्ष राहात नाही, पचनाच्या आणि वजनवाढीच्या समस्याही उद्भवतात.आपल्या वेटलॉसच्या निर्णयातला आणि त्याचा फायदा मिळवण्याच्या इच्छेतला हा सर्वात मोठा अडथळा असतो.