अनेकदा कामामुळे आपल्याला खूप थकवा आला किंवा झोप आली तर आपण बसल्या जागीही झोपतो. तुम्हाला कधी डेस्कवर काम करताना झोप लागली आहे का? जेव्हा तुमचं शरीर थकतं. झोप येते तेव्हा बसून झोपणं तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. ते कसं? जाणून घेऊया. आपल्या झोपेची स्थिती शारीरीक आरोग्यावर परिणामकारक असते. बसून झोपणे तुमच्या शरीरासाठी कधी फायदेशीर ठरू शकते किंवा कधी घातकही ठरू शकते.
बसून झोपण्याचे नेमके फायदे आणि तोटे काय?
गर्भधारणेदरम्यान आराम: गर्भवती महिलांना गरोदरपणात त्यांच्या पोटाची खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी योग्य आणि आरामदायक पोझिशन शोधण्यात महिलांना कसरत करावी लागते. बसून झोपल्याने त्यांच्या पोटात आराम आणि पाठीला आधार मिळाल्याचा फायदा होतो.
स्लीप एपनिया(Sleep Apnea) पासून संरक्षण – बसून झोपल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो अथवा ज्यांना स्लीप एपनियाची लक्षणं आहेत अशा पीडितांसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. डोके वरच्या बाजूस असल्याने त्या स्थितीचा फायदा होतो. बसल्याने अन्ननलिकेच्या कार्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे अशांनाही त्याचा फायदा होऊ शकतो.
परंतु बसून झोपण्याचे काही तोटेही आहेत.
सांधे ताठ होऊ शकतात – बसून झोपल्याने हालचाली आणि ताणण्याची क्षमता नसल्याने सांधे ताठ होऊ शकतात. अंथरुणात पडून झोपल्याने आपले शरीर ताणले जाऊ शकते. परंतु बसून झोपल्याने जास्त हालचाल करता येऊ शकत नाही.
पाठदुखीचा त्रास – बसून झोपल्याने एकाच स्थितीत जास्त वेळ राहणं शक्य होते. मात्र त्यामुळे पाठीच्या आणि शरीरात वेदना होऊ शकतात
रक्तभिसरणावर परिणाम – बराच वेळ एकाच स्थिती झोपल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा रक्तभिसरणावर वाईट परिणाम होऊ शकतो
बसून झोपल्याने तुमचा मृत्यू होण्याचा धोका?
जेव्हा आपण झोपतो तेव्हा किती काळ झोप लागते याचा अवधी नसतो. बराच वेळ झाला तर थ्रोम्बोसिस होण्याचा धोका असतो. बसून झोपल्याने पायाच्या आणि जांघांच्या शिरामध्ये रक्त्याच्या जमा होऊन गुठल्या बनू शकतात. दिर्घकाळ एकाच स्थितीत झोपण्याचा हा परिणाम असू शकतो. याबाबत काळजी घेतली नाही तर कदाचित व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यताही असते. डिप व्हेन थ्रोम्बोसिसची सामान्य लक्षणं म्हणजे अचानक घोट्या किंवा पाय दुखणे, त्वचा लालसर पडणे, पायाला सूज येणे या लक्षणांचा समावेश असतो.