शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

तुम्हाला वाटतं, आपल्याला दात नीट घासता येतात?

By admin | Published: May 31, 2017 4:27 PM

आपण दात रोज घासत असलो तरी दात कसे घासायचे हे अनेकांना माहितीच नसतं!

- नितांत महाजनस्वच्छ पांढरे दात, त्यासाठीच्या किती जाहिराती आपण रोज टीव्हीवर बघतो. रोज नियमित दात घासतो. खरंतर रात्री झोपताना रोज दात घासायला पाहिजे पण काहीजण एकदाच दात कसेबसे घासतात आणि लागतात कामाला दातांच्या आरोग्याविषयीच नाही तर एकुणच मौखिक आरोग्याविषयी आपल्याकडे घोर अज्ञान आहे.त्यात दंतउपचार महाग, त्यामुळे दात किडला, दुखला तरी अनेकजण अगदी असह्य होईपर्यंत दाताच्या डॉक्टरकडे जातच नाहीत. आणि बहुसंख्य माणसं तर भल्यासकाळी इतके भरर्कन दात घासतात की शून्य मिनिटात त्यांचे दात घासून होतात. त्यातून दातांना कीड, सुजलेल्या हिरड्या, मुख दुर्गंधी अशा कटकटी सर्रास मागे लागतात. मात्र त्याहीकडे कुणी लक्ष देत नाही. गोष्ट अगदी साधी वाटत असली आणि अत्यंत सामान्य भासत असली तरी ती अत्यावश्यक आहे. आणि सत्य तर हेच आहेत की, दात कसे घासायचे हे अत्यंत महत्वाचे कौशल्य आपल्याकडे कुणी शिकवतही नाहीत. त्याउलट लाइफ स्किल्स शिकवणाऱ्या जपानी शाळांमध्ये तर दात घासणं शिकवण्याचा एक खास समारंभच असतो. त्याला हामागाकी म्हणतात. मुलांना दात उत्तम घासता येणं, ते त्यांना आवडणं ही शालेय शिक्षणातील महत्वाची गोष्ट ठरते. आपल्याकडे रट्टामारु शिक्षणपद्धतीत हे होत नसलं तरी जब जागे तब सबेरा या न्यायाप्रमाणे दात घासण्याच्या उत्तम रीती शिकून घेतलेल्या बऱ्या!त्याआधी आपण दात घासताना काय चूका करतो हेदेखील माहिती करुन घ्यायला हवं.

घाई घाई उरकून टाकताय?आपण दात घासायला किती वेळ देतो? मिनिटभरापेक्षा जास्त वेळ देत नाही. कसेबसे खसखसा दात घासतो. अनेकांना वाटतं जितकी जास्त ताकद लावू तेवढे दात स्वच्छ होतात. पण तसं नाही. सावकाश, हलक्या हातानं, मायेनं आणि मसाज करतो तसे हळूवार दात घासायला हवेत. त्यानं दातांना, हिरड्यांना इजा होत नाही.ब्रश कसा निवडता?आपण विचारच करत नाही. दुकानदार जो देतो तो ब्रश आपण आणतो. पण हार्ड ब्रिसल्स, सॉफ्ट ब्रिसल्स आपल्या दाताला नक्की कसा ब्रश हवा हे आपण ना दातांना विचारतो, ना दातांच्या डॉक्टरला. पण चुकीचा ब्रश वापरला तर दातांना आणि हिरड्यांना लागून असलेलं इनामेल फाटतं, त्याला इजा होते. हिरड्यांतून रक्त येतं, पू येतो. तसं न करता उत्तम आणि योग्य ब्रश निवडायला हवा.गुळण्या करताय?खरंतर लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, गुळण्या करा, चूळ भरा पण मोठं होताहोता आपण ते विसरतो. दिवसातून एका जेवणानंतर तरी शक्यतो झोपताना तरी कोमट पाण्यानं गुळण्या करायला हव्यात.पाणी कमी पिताय?आता याचा दाताच्या आरोग्याशी काय संबंध? पाणी कमी राहिलं, तोंड आतून कोरडं झालं तरी तिथं बॅक्टेरियांची वाढ जोरात होते.त्यानं तोंडाला दुर्गंधी येते, दाताला कीड लागू शकते. त्यामुळे पाणी भरपूर प्या.दाताच्या डॉक्टरकडे जाताय?हे काम महागडं असतं हे मान्य. पण दात किडल्यावर आपण पैसे खर्च करतोच. त्यापेक्षा दर सहा महिन्यांनी डॉक्टरकडे जावून दात क्लिन करुन घेणं उत्तम.