शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

तुम्ही स्वतःला गुगल डॉक्टर समजता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:20 PM

स्व-निदान करण्याचा खेळ अनेकजण करतात, सतत गुगल करकरुन आजाराची माहिती घेतात, परिणाम?

- निशांत महाजन

आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काही टेस्ट करायला सांगतात. त्या करतो. आणि ती सगळी माहिती गुगलवर टाकून स्वतःला  काय झालं आहे याचं निदान करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टरांनी निदान केलं तर आपल्याला नेमका काय आजार झाला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न  करत इतर आजारी लोकांचे अनुभव वाचतो. त्यानं डोकं भंजाळून घेतोच. घाबरतो. इतरांना घाबरवतो. आपल्याला काहीतरी गंभीरच आजार झालेला आहे असं स्वतर्‍च ठरवतो. आणि त्यावर इतर अनेक पेशण्टने सुचवलेले उपचारही करायला लागतो. हे सारं घातक आहे हे कधी आपल्या मनातही येत नाही.पूर्वी असं होतं का, आपण डॉक्टरवर विश्वास ठेवायचो. त्यांनी सांगितलेली पत्थ्यं पाळायचो. मात्र आता आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच उरलेली नाही. साध्या साध्या गोष्टींसाठीही लोक स्पेशलिस्टकडेच जातात. शे पन्नास टेस्ट केल्या जातात. आणि त्यातून काही रिपोर्ट हाती येतात. अर्थात त्या रिपोर्टवरही लिहिलेलं असतं की काही गोष्टी संदर्भानं घ्याव्यात.पण आपण तसं न करतात ते सारं गुगलवर ताडून पाहतो. साधं पित्त झालं तरी उपचार गुगलवर तपासतो. ते औषधं घेतो, मेडिकल स्टोअरमध्ये जावून औषधं घेतो. अनेकजण तर लहान मुलांनाही अशी औषधं देतात. घरगुती उपाय करतात.आणि चिंतेत बुडून जातात की आपल्याला काहीतरी भयंकर गंभीर आजार झालेला आहे.इथवरही सारं ठीक. मात्र काहीजण तर डॉक्टरांना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. त्यांना माहिती देतात. मला हेच झालं नसेल कशावरुन असं विचारतात. डॉक्टर जे औषधं देतात त्यांचे साइड इफेक्ट्स काय याचीही माहिती गुगलवरुन घेतात आणि त्याविषयी डॉक्टरांना कचाटय़ात पकडतात.म्हणजे माहिती हाताशी असू नये असं नाही पण माहिती वाचणं वेगळं, ती कोरिलेट करुन निदान करणं वेगळं. निदान इतकं सोपं असतं तर डॉक्टरांची गरजच काय होती. पण असा सारासार विचार न करता गुगल डॉक्टर होतात अनेकजण.हे स्वत:च्या संदर्भात चालतं तोवर ठीक, मात्र काहीजण इतरांना फुकट सल्ले देतात. त्यांनाही आपलं गुगल ज्ञान वाटतात. त्यातून जे गुंते होतात ते वेगळे.आपल्या जीवाशी खेळू नये. स्व उपचार आणि गुगल ग्यानचे प्रयोग स्वत:वर करणं धोक्याचं ठरू शकतं.