शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

डॉक्टरांनुसार पोट फुगण्याची समस्या दूर करणारं खास पाणी, जाणून घ्या कसं बनवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:00 AM

Stomach Health : डॉक्टरांनी एका खास होममेड ड्रिंकबाबत सांगितलं की, ज्याचं सेवन करून पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.

Stomach Health : आपल्या खाण्या-पिण्याचा थेट संबंध आपल्या पोटावर पडत असतो. आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो त्यानुसार आपलं मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. खाण्या-पिण्यात थोडी जरी गडबड झाली तर पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जसे की, पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी आणि मळमळ होणे. जर तुम्हाला नेहमीच अशा समस्या होत असतील या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टर अपराजिता लांबा एक उपाय सांगणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. डॉक्टरांनी एका खास होममेड ड्रिंकबाबत सांगितलं की, ज्याचं सेवन करून पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. हे खास ड्रिंक तुम्ही ३ मसाल्यांच्या मदतीने तयार करू शकता.

ब्लोटिंग दूर करणारं होममेड ड्रिंक

हे ड्रिंक तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे अपराजिता लांबा यांनी सांगितले आहेत. अपराजिता डर्मेटोलॉजिस्ट असून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या टिप्स सांगत असतात.

ब्लोटिंग दूर करण्यासाठी बडीशेप, जिरे आणि ओव्याचं खास ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ४०० ते ५०० मिलीलीटर पाणी घ्या. यात एक छोटा चमचा जिरे, बडीशेप आणि ओवा टाका. या गोष्टी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी हलक गरम करून पिऊ शकता. या पाण्याने पोट फुगण्याची समस्या दूर होईल, सोबतच याने पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. आतड्या आतून साफ होतात आणि भूकही वाढते. इतकंच नाही तर या पाण्याने पचन तंत्रही चांगलं राहतं.

या मसाल्यांचे फायदे

- बडीशेपच्या दाण्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या होणाऱ्या नुकसानापासून वाचवततात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि फायदेशीर अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. त्याशिवाय बडीशेपच्या दाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते.

- जिऱ्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांसोबतच अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. तसेच यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. जिऱ्याच्या सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

- ओव्यामध्ये फायबर, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात. ओव्याने पोट चांगलं राहतं आणि सोबतच शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य