आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवरून आपलं आरोग्य कसं आहे हे समजतं. जर तुमचा रोजचा आहार पौष्टिक असेल किंवा तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी हेल्दी असतील तर पोट, आतड्या आणि पचन तंत्र चांगलं राहतं. तुम्हालाही माहीत असेल की, जास्तीत जास्त आजारांचं मूळ हे पोटात असतं. पोटापासूनच अनेक गंभीर आजारांना सुरूवात होते. अशात पोटासाठी घातक अशा पदार्थांचं सेवन न करण्याचा सल्ला एक्सपर्ट नेहमीच देत असतात.
जर पोटाचं आरोग्य चांगलं नसेल तर बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे, अॅसिडिटी, पाईल्स, अपचन, अॅसिड रिफ्लक्स, जुलाब, डायरिया अशा अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. अशात गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पोटासाठी, आतड्यांसाठी सगळ्यात घातक तीन पदार्थांबाबत सांगितलं आहे. जर हे पदार्थ तुम्ही नियमितपणे खात असाल तर तुम्ही आजारांचे शिकार होऊ शकता.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड
डॉक्टर सौरभ यांनी सांगितलं की, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्समध्ये प्रिजर्वेटिवचं प्रमाण भरपूर असतं. त्याशिवाय यात अनहेल्दी फॅटचं प्रमाण देखील भरपूर असतं. ज्यामुळे यांचं सेवन केल्याने आतड्यांचं आरोग्य बिघडतं. पुढे याच कारणाने पचन तंत्रावरही वाईट प्रभाव पडतो.
डीप फ्राइड फूड
फार जास्त तळलेले पदार्थ पचवणं फार अवघड असतं आणि यामुळे पचनक्रिया हळुवार होते. इतकंच नाही तर या पदार्थांमुळे गॅस आणि अॅसिड रिफ्लक्सची समस्याही होऊ शकते. तळलेले पदार्थ तुम्ही कधी-कधी खाऊ शकता. ते तळण्यासाठी तुम्ही रिफाइंड ऑईल, ऑलिव ऑईल, अवोकेडो ऑईल, तूप आणि रिफाइंड कोकोनट ऑईलचा वापर करावा.
रेगुलर आणि डाएट ड्रिंक्स
बरेच लोक नेहमीच डाएट ड्रिंकचं सेवन करतात. डाएटमध्ये आर्टिफिशिअल स्वीटनरचा वापर केल्याने आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया डॅमेज होतात. तसेच या ड्रिंक्समध्ये शुगरचं प्रमाण देखील खूप जास्त असतं, ज्यामुळे पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो.