Hair Fall Reason: आजकाल फार कमी वयात लोकांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागत. कमी वयातच लोकांचं टक्कल पडत आहे. अशात लोक केसगळती थांबवण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स आणि प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण यांचे दुष्परिणामही खूप असतात. मुळात लोक एक सगळ्यात मोठी चूक करतात. ती म्हणजे केसगळतीचं कारण न शोधणे. जर लोकांनी केसगळतीचं कारण शोधलं तर त्यानुसार त्यांना उपायही करता येतील. आज तेच कारण जाणून घेणार आहोत.
शरीराला आपल्या वेगवेगळ्या क्रिया पूर्ण करण्यासाठी पोषक तत्व, खनिजं आणि व्हिटॅमिनची गरज असते. शरीरात कोणतेही पोषक तत्व किंवा व्हिटॅमिन्स कमी झाले तर वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. असंच एक व्हिटॅमिन आहे जे शरीरात कमी झालं केसगळतीची समस्या होते आणि चेहऱ्यावर पुरळ येऊ लागतात. हे व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन डी. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अंकुर सरीन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
व्हिटॅमिन डी कमी झाल्यास केसगळती
डॉ. सरीन यांनी सांगितलं की, व्हिटॅमिन डी इम्यून सिस्टीम रेग्युलेट करण्याचं काम करतं. व्हिटॅमिन डी शरीरात कमी झालं तर शरीराची इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे त्वचेवर जास्त इन्फेक्शन होऊ लागतं. त्वचेवर प्रोपियोनिबॅक्टीरियम एक्नेस नावाचे बॅक्टेरीया वाढू लागतात. ज्यामुळे त्वचेवर पुरळ येते.
केसगळतीबाबत डॉ. सरीन यांनी सांगितलं की, व्हिटॅमिन डी हेअर फॉलिकल्सच्या विकासासाठी गरजेचं असतं. जर हे व्हिटॅमिन कमी झालं तर केस खूप पातळ होतात आणि मग केसगळती होऊ लागते. याचं मुख्य कारण हेअर फॉलिकल्स अॅक्टिव नसणं.
कसं मिळवाल व्हिटॅमिन डी
सूर्याची किरणं व्हिटॅमिन डी चा सोर्स आहेत. अशात रोज किमान १५ मिनिटे उन्हात बसावं. जर रोज शक्य नसेल तर किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा उन्हात थांबावं. याने शरीराला भरपूर व्हिटॅमिन डी मिळतं. तसेच वेगवेगळ्या पदार्थांमधूनही हे व्हिटॅमिन मिळतं. मासे, मशरूम, दूध, संत्री यात भरपूर व्हिटॅमिन डी असतं.
शरीराला व्हिटॅमिन डी मुळे अनेक फायदे मिळतात. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्यास मदत करतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत राहतं. तसेच मानसिक समस्या दूर करण्यासही याची मदत मिळते.