Evening Tea Side Effects : चहा हे एक असं पेय आहे ज्याने जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात होते. चहा प्यायल्याशिवाय अनेकांचं एकही काम होत नाही. अनेकांना तर चहाची सवयच लागलेली असते. काही लोक सकाळी आणि सायंकाळी चहा पिणं पसंत करतात तर काही लोक दिवसातून कित्येक कप चहा पितात.
मात्र, एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, जास्त प्रमाणात चहाचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. खासकरून सायंकाळी चहाचं सेवन करणं जास्त नुकसानकारक ठरतं. हा दावा आमचा नाही तर आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यात सायंकाळी कुणी चहा प्यावा आणि कुणी टाळावा याबाबत सांगितलं आहे.
सायंकाळी चहा पिण्याचे नुकसान?
मेडिकल सायन्सनुसार, चांगली झोप येण्यासाठी झोपण्याच्या १० तासांआधीपर्यंत कॅफीनचं सेवन टाळलं पाहिजे. सायंकाळी चहाचं सेवन टाळल्याने लिव्हर डिटॉक्स होण्यास, कार्टिसोल(सूज) कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. अशात डॉक्टरांनी सांगितलं की, कुणी चहा प्यावा आणि कुणी पिऊ नये.
कुणी सायंकाळी चहा टाळावा?
- ज्या लोकांना रात्री चांगली झोप येत नाही किंवा रात्री जाग येत असेल अशा लोकांनी सायंकाळी चहाचं सेवन टाळावं.
- चिंता आणि तणावात असलेल्या लोकांनी सायंकाळी दुधाच्या चहाचं सेवन करू नये.
- वाताची समस्या असलेले, ड्राय स्कीन असलेले आणि केसांची समस्या असलेल्या लोकांनी सायंकाळी चहा पिऊ नये.
- वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी सायंकाळी चहा पिऊ नये.
- भूक कमी लागण्याची समस्या असलेल्या लोकांनी चहा पिऊ नये.
- हार्मोनसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी चहाचं सेवन टाळलं पाहिजे.
- जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या असेल तर चहा टाळावा.
- मेटाबॉलिक आणि ऑटो-इम्यून ची समस्या असणाऱ्यांची चहा टाळावा.
सायंकाळी चहा कोण पिऊ शकतं?
- जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात.
- असे लोक ज्यांना अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिकची समस्या नसेल.
- जर तुमचं पचन तंत्र योग्य असेल.
- जर तुम्हाला चहाची सवय नसेल तर...
- झोपेसंबंधी समस्या नसेल तर...
- रोज वेळेवर जेवण करणारे लोक...