Healthy Juice For Kids: लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालक नेहमीच चिंतेत असतात. लहान मुलांचे खाण्या-पिण्याचे फार नखरे असतात आणि याच कारणाने त्यांची इम्युनिटी पावर कमजोर असते. ज्यामुळे ते सतत आजारी पडतात आणि त्यांच्या एकूण विकासावर प्रभाव पडतो. त्यामुळे मुलांचे एक्सपर्ट सांगतात की, त्यांची इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी त्यांना पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस द्या. चला जाणून घेऊ लहान मुलांसाठी हा ज्यूस कसा फायदेशीर ठरतो आणि कसा तयार करायचा.
या ज्यूसचे फायदे
पांढरा भोपळा ही एक आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे. पण लहान मुलांना याची भाजी आवडत नाही. पण ही भाजी अनेक दृष्टीने खूप चांगली आहे. यात अनेक पोषक तत्वे आहेत. ज्यामुळे इम्यूनिटी पॉवर वाढते. सोबत लहान मुलांच्या विकासातही मदत मिळते. या अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात जे मुलांसाठी चांगले असतात. यामुळे पोट साफ होतं आणि त्वचाही चांगली होते. तसेच यात फायबरही भरपूर असतं ज्यामुळे मेटाबॉल्जिम मजबूत होतं.
कसं तयार कराल हे ज्यूस?
1) पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस घरीच तयार करणं सोपं आहे. यासाठी 1 पाव पांढरा भोपळा घ्या. तसेच भाजलेले जिंर, लिंबाचा रस आणि थोडं मीठ हवं.
2) सगळ्यात आधी पांढरा भोपळा कापून तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये टाका. आता त्यात थोडं पाणी टाकून ब्लेंड करा. नंतर एका चाळणीच्या मदतीने ज्यूस गाळून एका भांड्यात काढा.
3) हे पाणी एका ग्लासमध्ये टाका, त्यात भाजलेलं जिरं, लिंबाचा रस आणि थोडं मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा. काही वेळ फ्रिजमध्येही ठेवू शकता.
4) हा ज्यूस लहान मुलांना रोज प्यायला द्या. याने त्यांची शक्ती आणि इम्यूनिटी वाढेल. तसेच त्यांच्या एकूण विकासातही मदत होईल.
5) ज्या लोकांचं पोट खराब असतं ते लोकही हा ज्यूस पिऊ शकता. कारण हा ज्यूस पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फार फायदेशीर असतो.