नवी दिल्ली : भारताच्याडॉक्टरांनी (Doctors) पुन्हा एकदा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डॉक्टरांच्या टीमने एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Complex Surgery) करून दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या हृदयाच्या व्हॉल्व्हमधून 'सहा सेमी लांबीचा फंगल बॉल (Fungal Ball)' काढण्यात यश मिळवले आहे. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.
गंभीर हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या सुरेश चंद्रा यांनी मीडियाला सांगितले की, 2021 मध्ये त्यांना कोरोनाची लागण (Corona Infected) झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट केले होते. तसेच, कोरोनाची लागण झाल्यानंतर काही महिन्यांनंतर त्यांना वारंवार खोकला आणि ताप येत होता. यासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांशी संपर्कही केला. कोरोना संसर्गानंतर ही सामान्य लक्षणे असू शकतात, असे त्यावेळी सर्व डॉक्टरांना वाटले होते, असे रुग्ण सुरेश चंद्रा यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी त्यांच्या महाधमनीचा (एओर्टिक) व्हॉल्व्ह बदलण्यात आला होता. रुग्ण सुरेश चंद्र यांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. त्यानंतर त्यांनी या आजाराबाबत फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी डॉक्टरांनी आपल्या तपासणीत उघड केले की, हा एक प्रकारचा दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग 'इंफेक्टिव एंडोकार्डिटिस' आहे. या आजाराची लक्षणे आढळून आल्यावर, अनुभवी डॉक्टरांच्या टीमने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या हृदयाच्या व्हॉल्व्हमधून सहा सेमी लांबीचा 'फंगल बॉल' काढण्यात यश मिळवले.
ऑपरेशननंतर 45 दिवस अँटी-फंगल औषधअधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक अत्यंत दुर्मिळ केस आहे, जी हृदयाचे ऑपरेशन करणार्या रूग्णांमध्ये बर्याच वेळा आढळते आणि अशा प्रकरणांमध्ये रूग्ण जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के असते. काही महिन्यांपूर्वी हे ऑपरेशन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, डॉक्टरांच्या देखरेखीखाली, रुग्णाला 45 दिवसांपर्यंत नसाद्वारे अँटी-फंगल औषध देण्यात आले. यादरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असून आता तो पूर्णपणे बरा आहे.