- डॉ. प्रीती ठाकोर, जनरल मेडिकल अफेअर्स मॅनेजर, जॉन्सन अॅंड जॉन्सन कन्झ्युमर हेल्थ इंडिया
नवजात मुले ही आनंदाचा ठेवा असतात. त्यांच्यामुळे प्रत्येक पालकाचे आयुष्य उजळून निघते. या मुलांमुळेच पालकत्व स्वीकारणे, तसेच शिकणे, प्रेम करणे, संयम बाळगणे या मूल्यांचा स्वीकार पालक करू लागतात. चांगल्या कपड्यांची खरेदी असो अथवा योग्य स्वरुपाची स्किनकेअर उत्पादने असो, पालकांना आपल्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ट गोष्टीच हव्या असतात. सध्याच्या अनिश्चित वातावरणात अनेक पालक चिंतेत आहेत, विशेषतः प्रथमच अपत्यप्राप्ती झालेले पालक तणावाखाली आहेत.
मुलांना सांभाळण्यासाठी सध्या पाळणाघरे उपलब्ध नाहीत, बाळांना मालिश करायला किंवा आंघोळ घालायला दाई मिळत नाही, स्वतंत्र राहणाऱ्या दाम्पत्यांना बाळाच्या आजी-आजोबांची मदत मिळणेही शक्य नसते; अशा वेळी बाळाच्या आईला व वडिलांना त्याची जबाबदारी आलटून-पालटून घ्यावी लागत आहे आणि आपल्या शंका, आपले प्रश्न यांवर स्वतःच उत्तरे शोधावी लागत आहेत.
नवजात शिशूंना मालिश करणे व आंघोळ घालणे याबद्दल प्रथमच पालक झालेल्यांना काही शंका असू शकतात; परंतु काही सोप्या मार्गांचा अवलंब केल्यास ही नित्याची मजेदार क्रिया बनू शकते. बाळाचे बाह्य जगाकडून संरक्षण करण्यात त्याची त्वचा ही मोलाची भूमिका बजावते, त्यामुळे ती स्वच्छ, आर्द्र आणि ओलसर ठेवणे महत्वाचे आहे. वैद्यकीयदृष्ट्या सौम्य अशा सिद्ध उत्पादनांची निवड केल्याने, बाळाच्या त्वचेची काळजी शंभर टक्के सौम्य पद्धतीने घेतली जाईल.
बाळाची काळजी घेणे ही एक कला आहे आणि ते विज्ञानही आहे. नवीन पालकांना त्याबद्दल आत्मविश्वास वाटणे गरजेचे आहे. आजकाल उपलब्ध असलेले विविध ब्रॅण्ड्स हे केवळ मुलांची गरज भागविण्यासाठीच विकसित झालेले नाहीत, तर प्रत्येक वयात आणि प्रत्येक टप्प्यावर मुलांची काळजी घेण्याच्या क्षणांचे रुपांतर मुले व पालक यांच्यातील बंध दृढ होण्याची संधी निर्माण करण्याकरीता रचण्यात आलेले आहेत.
प्रेमाने मालिश करणे
नवजात शिशू फार हालचाली करीत असतात आणि त्यांना मालिश करणे हे काम दिव्यच असते. आपल्या बाळाच्या त्वचेवर मसाज करण्यासाठी सौम्य तेल निवडणे आवश्यक आहे. हे तेल त्वचेमध्ये जलद व सहज शोषले जावे, ते हलके असावे आणि त्याचे त्वचेवर कोणतेही डाग राहू नयेत. हळू आणि सकारात्मक पद्धतीने त्याच्या अंगावर हात फिरवणे, एकाच भागावर जास्त वेळ न घालवणे, यातून बाळाला चांगले मालिश होते. सौम्य आणि प्रेमळ स्पर्शाने नियमित मालिश केल्यामुळे पालकांचे त्यांच्या बाळाशी असलेले भावनिक बंध वाढतात व बाळाचे आकलन वाढून निरोगी विकास होतो.
सहजपणे आंघोळ घालणे
बाळाच्या आंघोळीसाठी योग्य ती उत्पादने वापरणे हेही फार महत्त्वाचे आहे. आंघोळीच्या वेळी आपल्याला बाळासह मौल्यवान क्षण घालवता येतातच, त्याशिवाय त्याच्या नाजूक त्वचेचीही काळजी घेता येते. बाळाला आंघोळ घालताना त्याचे अंग एका हाताने चोळत असताना, दुसर्या हाताने त्याला व्यवस्थित आधार देणे आवश्यक आहे. अशा वेळी, कमी निसरड्या, सहज व जलदपणे धुवून काढता येणाऱ्या वॉशची शिफारस केली जाते.
‘एका हाताने सुलभपणे वापरण्याजोगा पंप पॅक’ अशा नाविन्यपूर्ण उत्पादनासारखी इतरही यूजर-फ्रेंडली उत्पादने सध्या उपलब्ध आहेत. ती जास्त प्रमाणात वॉश वितरित करीत नाहीत आणि पालकांना बाळावर एक हात ठेवण्याची सोय उपलब्ध करून देतात; अशा प्रकारे सांडणे व स्वच्छता करावी लागणे हे प्रकार टाळता येतात. अशी उत्पादने वापरण्याचा अनुभव पालकांना असल्यास, त्यांना अधिक आरामात, आत्मविश्वासाने व काळजीपूर्वक बाळाला हाताळणे जमते. या सुविधांमुळे बाळाचे वडीलही बाळास आत्मविश्वासाने स्नान घालू शकतात.
केसांची निगा
लहान मूल चालण्याच्या वयात येऊ लागल्यावर, त्याच्या केसांचे पोषण करण्यासाठी बेबी शाम्पू व कंडिशनर वापरावा. यासाठी चटकन धुता येण्याजोगा आणि विशेष पद्धतींनी बनविलेला शाम्पू वापरणे गरजेचे आहे. हा शाम्पू बाळाच्या डोळ्यात जाणार नाही व तो सौम्य असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेषत: जाड, कुरळे केस असलेल्या लहान मुलांच्या केसांमधील गाठी व गुंते यामुळे सोडविता येतील. बाळाच्या केसांची निगा राखण्यासाठी ‘टू-इन-वन शाम्पू विथ कंडिशनर’ याचाही विचार केला जाऊ शकतो.
आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी
एखाद्या बाळाची त्वचा नाजूक असते, परंतु ती प्रौढांच्या त्वचेपेक्षा जलद गतीने पाणी शोषून घेते आणि पाणी गमावण्याची क्रियाही ती अधिक वेगाने करते. अशा वेळी, या बाळाला आंघोळ घातल्यावर त्याच्यासाठी खास तयार केलेला हलका मॉइश्चरायझर किंवा लोशन वापरण्याची शिफारस केली जाते. नियमित मॉइश्चरायझिंगमुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत होते. विशेषत: बाळाच्या त्वचेसाठी तयार केलेले मॉइश्चरायझर वापरल्यास, त्याच्या त्वचेच संरक्षण होते व तिचे आरोग्यही राखता येते. फक्त धुम्रपान नाही तर 'या' कारणांमुळे उद्भवतोय फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका; जाणून घ्या लक्षणं
हे सर्व सोपस्कार सुरू करण्यापूर्वी बाळाशी हळूवारपणे काही मिनिटे बोलण्याने बाळ मनातून तयार होते. आपल्या बाळावर आपले प्रेम व्यक्त करण्याचा स्पर्श हा एक प्रभावशाली मार्ग आहे. पालकांना उपयोगी पडणाऱ्या उत्पादनांमध्ये केवळ आवश्यक व विशिष्ट हेतूंनी प्रेरित असे घटक असतात. त्यांच्या माध्यमातून छोट्या, साध्या; परंतु महत्त्वपूर्ण पद्धतींचा अवलंब केल्याने सुंदर, सुधारीत अनुभव मिळतात व पालकत्वाचा प्रवास सुरळीत होतो. कोमलता ही एक महत्त्वाची गोष्ट आहे; कारण कोमल म्हणजे सुरक्षित, शुद्ध, विश्वासार्ह, तसेच आनंदी निरोगी बाळ व त्याचे कुटुंब! सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत