(Image Credit : SafeBee)
डॉक्टरांना भेटायला गेलेले रुग्ण रुग्णालयात गेल्यावर आरोग्य चांगलं ठेवण्याचा जमेल तो प्रयत्न करत असतात. आजारापासून ते औषधांपर्यंत सगळी माहिती त्यांना घ्यायची असते. पण क्वचितच कुणी डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कपड्यांकडे लक्ष देत असतील. जास्तीत लोक डॉक्टर्सने घातलेला पांढऱ्याचा रंगाचा अॅपरनला स्वच्छ समजतात. पण एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, या पांढऱ्या अॅपरनमध्ये अनेक नुकसानकारक कीटाणू असू शकतात.
(Image Credit : The Boston Globe)
अमेरिकेतील एका रिसर्चमध्ये आढळलं की, डॉक्टर्सच्या पांढऱ्या कोटवर नेहमीच अनेकप्रकारचे ड्रग रेसिस्टेंट बॅक्टेरिया असतात. डॉक्टर्सच्या कोटवर अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आढळले, ज्याने गंभीर त्वचारोग, ब्लड इन्फेक्शन आणि निमोनिया सारखे गंभीर आजार होऊ शकतात. केवळ डॉक्टरांच्याच नाही तर स्टेथोस्कोप, फोन आणि नर्सच्या यूनिफॉर्ममध्येही अनेकप्रकारचे बॅक्टेरिया असतात.
आता हा प्रश्न उपस्थित होतो की, यापासून बचाव कसा करायचा? रिसर्चनुसार अॅंटीमायक्रोबिअल टेक्सटाइलच्या वापराने काही प्रकारच्या कीटाणूंपासून बचाव केला जाऊ शकतो. हे कपडे रोज धुवूनच ही समस्या काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते. पण रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कपडे धुतल्यानंतर काही वेळाने पुन्हा कीटाणू त्यावर येतात.
अमेरिकन फिजिशिअन्सवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असे आढळले की, अनेक डॉक्टर्स साधारण एक आठवड्यापर्यंत त्यांचा कोट धुवत नाहीत. १७ टक्के डॉक्टर्स साधारण १ महिना त्यांचा कोट धुवत नाहीत. लंडनच्या देखील एका रिसर्चमध्ये डॉक्टरांच्या कोट आणि टायबाबत अशाच गोष्टी समोर आल्या आहेत.