शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

उन्हाळ्यात अंगाला खाज येतेय? तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 1:48 PM

त्वचेला खाज येणे हा तसा दुर्लक्ष करण्याचा प्रकार अजिबात नाहीये. कारण त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो.

उन्हाळा सुरु होताच गर्मी होणे, घाम येणे आणि त्यासोबतच अंगाला खाज येण्यासारखे प्रकार सुरु होतात. ब-याचदा हे अधिक त्रासदायक ठरतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की, अंगावर घामोळ्या येण्यास सुरुवात होते. यामुळे त्वेचेला खाज येते. चला तर मग पाहूयात काय आहेत हे उपाय…

त्वचेला खाज येणे हा तसा दुर्लक्ष करण्याचा प्रकार अजिबात नाहीये. कारण त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असतं. तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे या त्रासातून तुमची सुटका होईल.

त्वचेला येत असलेल्या खाजमुळे अनेकजण त्रस्त असतात यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे खाज येणा-या जागेवर लावावेत. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळून पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर लावावे. चार ते सहा तासांच्या अंतरामध्ये अशा प्रकारे तुम्ही बर्फाचे तुकडे खाज येत असलेल्या जागेवर लावू शकता. 

शरिराला येत असलेली खाज थांबविण्यासाठी मिठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा. तसेच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी. आठवड्यातून एकदा अशा प्रकारे उपाय केल्यास त्वचेला होणारी जळजळ आणि खाज रोखण्यास मदत होते. उन्हापासून वाचण्यासाठी त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावता येऊ शकते.

उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.

उन्हाळ्यात येणारा घामाचा वास, अंगाला खाज येणे तसेच जळजळ होण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्यात आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य