Can Paracetamol Damage The Liver: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर सूज येण्याची समस्या भारतात खूप वाढली आहे. तसेच जास्तीत जास्त लोक जरा ताप आला की, आपल्याच मनाने पॅरासिटोमोलचं सेवन करतात. पण ताप आल्यावर पॅरासिटामोल खाणं लिव्हरच्या आरोग्यासाठी फार घातक आहे. लिव्हरच्या समस्या होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. ज्यात शरीराची अजिबात हालचाल न करणं याचाही समावेश आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. शिव कुमार सरीन यांना प्रश्न विचारला की, जास्त पॅरासिटामोलचं सेवन केल्याने लिव्हरवर प्रभाव पडतो का? तर यावर डॉक्टरांनी सांगितलं की, ही चांगली सवय नाहीये. लिव्हरमध्ये ग्लूटोथिओन नावाचा एक पदार्थ असतो, जो या अवयवाची सुरक्षा करतो.
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, जर एखादी व्यक्ती ड्रिंक करत असेल म्हणजे दारू पित असेल तर पॅरासिटामोलला ब्रेकडाऊन आणि न्यूट्रलाइज करण्यासाठी ग्लूटोथिओन हवं. लठ्ठ व्यक्तीमध्ये ग्लूटोथिओन कमी असतं, ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीमध्येही ते कमी असतं. प्रत्येक शरीराची किती पॅरासिटामोल घ्याव्या याची एक क्षमता असते. डॉक्टरांनुसार आज अमेरिका आणि लंडनमध्ये लिव्हर फेलिअरचं सगळ्यात मोठं कारण पॅरासिटामोल आहे. हे औषध एक पेनकिलरही आहे. २ ते ३ गोळ्यांपेक्षा जास्त याचं सेवन करू नये. जर घ्यायचीच असेल तर अर्धी-अर्धी गोळी दिवसातून ३ ते ४ वेळा घेऊ शकता.
'दारू विष आहे'
डॉ. सरीन यांनी दारू पिण्याच्या दुष्परिणामांबाबतही सांगितलं. ते म्हणाले की, दारू एक विष आहे. सगळ्यांना हे माहीत आहे तरी ते पितात. पण प्रत्येकाचं शरीर दारू प्यायल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित होतं. अशात आतड्यांमध्ये बॅक्टेरिया होतात. अशात लिव्हरच्या वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे दारूला विष म्हटलं जातं.
लठ्ठपणा लिव्हरसाठी घातक
डॉ. सरीन यांनी लठ्ठपणाबाबतही चिंता व्यक्त केली. खासकरून तरूणांमध्ये असलेला लठ्ठपणा घातक असल्याचं ते म्हणाले. त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढण्याचं कारण सॉफ्ट ड्रिंक्स, पॅक्ड ज्यूस आणि शुगरचं अधिक सेवन आहे. त्यांनी हेही सांगितलं की, भारतात दर ३ पैकी एक व्यक्ती फॅटी लिव्हरचा शिकार आहे.