शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 4:54 PM

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा एक चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...?

बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठले की, गरम पाणी घेतात. ते इतरांनाही अशा प्रकारचा सल्ला देत असतात. एवढेच नाही, तर गरम पाणी पिणारे दोन लोक भेटले आणि विषय निघाला की, त्यांच्यात कोण किती पाणी पितं? यावरही चर्चा होताना आपण अनेक वेळा बघतो, ऐकतो. मात्र, गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा खरोखरच चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...?

यासंदर्भात माहिती देताना द माइंडफूल डायटच्या (The Mindful Diet) आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात, "जेव्हा आपण सकाळी गरम पाणी घेतो, तेव्हा आपला मेटॅबॉलिक रेट वाढायला सुरुवात होते. मेटॅबॉलिक रेट वाढल्याने आपण जे काही अन्नपदार्थ पाण्यासोबत घेतो, ते चांगल्या पद्धतीने पचायला सुरुवात होते. साधारणपणे असे म्हटले जाते की, आपण गरम पाण्यासोबत काही मेडिसीन घेत असू, तर त्या मेडिसीनचे अॅब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होते. ते वेगाने काम करायला लागतात."

गरम पाण्याचे फायदे -मंजिरी कुलकर्णी सांगतात, "खरे तर, गरम पाण्याचे निश्चितच भरपूर फायदे आहेत. आपण जेव्हा गरम पाणी प्यायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या शरीरातील सूज वेगाने कमी होते. आता वजन कमी होतं म्हणजे काय? तर, जेव्हा आपली लाईफस्टाइल चांगली नसते किंवा आपल्या खाण्याच्या सवयी हेल्दी नसतात, तेव्हा आपल्या शरिरात एक प्रकारची सूज तयार झालेली असते. साधारणपणे ओबेसिटीमध्ये अथवा ओबेसिटी रिलेटेड डिसॉर्डरमध्ये ही सूज आपल्याला दिसून येते. यामुळे, जेव्हा एखादी वजन जास्त असलेली व्यक्ती गरम पाणी प्यायला सुरुवात करते, तेव्हा गरम पाणी प्यायल्याने मेटॅबॉलिक रेट वाढतो आणि यामुळे शरीरातील सूज झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते." 

"ही कमी झालेली सूज आपल्याला वजनाच्या म्हणजेच आकड्यांच्या स्वरुपात दिसते. पण यामुळे, चरबीचे प्रमाण कमी होत नाही. चरबीचे प्रमाण कमी होण्यासाठी आपल्याला डायटरी चेन्जसच आवश्यक आहेत आणि तेच करणे अपेक्षित आहे. म्हणजे आपण काहीही खात आहात आणि गरम पाणी रोज पीत आहात, तर गरम पाणी प्यायल्यानेच तुमची चरबी अथवा वजन कमी होईल असे नाही," असेही मंजिरी कुलकर्णी सांगतात. 

गरम पाणी दिवसभर चहा प्रमाणे घेतले तर...? -त्या पुढे सांगतात, "गरम पाण्याचा फायदा निश्चितच होतो. आपल्या शरीरावरील सूज कमी होते. डायजेशन व्यवस्थित होते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, आपण वाटेल ते खाऊ शकता आणि नुसतेच गरम पाणी घेऊन तुमचे वजन कमी होते. तर गरम पाण्याने मेटॅबॉलिक रेट वाढतो, डायजेशन चांगले होते. गरम पाणी केवळ सकाळीच न पिता, आपण दिवसभर चहा प्रमाणे घेत असाल तर त्याचे फायदेही खूप चांगले आहेत." 

गरम पाणी सर्वांना चालते का?गरम पाणी सर्वांना चालते का? यासंदर्भात बोलताना मंजिरी म्हणतात, "नाही. ज्या लोकांना उष्णतेचे विकार आहेत, ज्यांना पाइल्स सारखी समस्या आहे, अशा लोकांना गरम पाणी चालत नाही. यामुळे, आपण गरम पाणी प्यायला सुरुवात करायची आहे की नाही, हे आपण आपले शरीर आणि प्रकृती बघून ठरवायला हवे." 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सWaterपाणीHealthआरोग्य