Diabetes Cause : आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. लोकांना खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी लागल्या आहेत. फोनचा वापर वाढला आणि अशात रात्रीचं जागणंही वाढलं आहे. जे अनेक आजारांचा कारण ठरू शकतं. रात्री जास्त वेळ जागी राहिल्याने सगळ्यात जास्त धोका डायबिटीसचा असतो.
भारत देश हा डायबिटीसची राजधानी मानला जातो. एकदा जर डायबिटीस झाला तर हा आजार आयुष्यभर सोबत राहतो. कारण हा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही. फक्त याला नियंत्रणात ठेवता येतं. आयुष्यभर या आजाराचे साइड इफेक्ट्स जाणवतात.
एका स्टडीमधून हा खुलासा झाला आहे की, रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्या लोकांना टाइप 2 डायबिटीसचा धोका सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांच्या तुलनेत 46 टक्के असतो.
5000 लोकांवर स्टडी
हा रिसर्च नेदरलॅंडच्या लेडेन यूनिवर्सिटी मेडिकल सेंटर द्वारे करण्यात आला आहे. ज्यात जवळपास 5 हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं.
कोणत्या कारणाने होतो डायबिटीस?
रिसर्चमधून समोर आलं आहे की, रात्री जास्त वेळ जागणाऱ्या लोकांच्या शारीरिक घड्याळात गडबड होते, ज्यामुळे टाइप-2 डायबिटीसचा धोका खूप जास्त वाढतो.
उशीरा उठणाऱ्या लोकांमध्ये वाढतं फॅट
अभ्यासकांना आढळलं की, उशीरा झोपेतून उठणाऱ्या लोकांच्या शरीरात फॅट म्हणजे चरबी जास्त असते. ज्यात जास्त आतड्यांची चरबी आणि लिव्हरची चरबी यांचा समावेश आहे. यामुळेच त्यांना टाइप-2 डायबिटीसचा धोका अधिक असतो.