शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

टाइटफिट, हायहिल्स, हेवी ज्वेलरी नेहेमीच वापरता का? मग तुम्हाला या आजारांचा धोका आहे!

By admin | Published: May 08, 2017 6:52 PM

कपडे, चपला, ज्वेलरी यांची चुकीची फॅशन जर कायम फॉलो केली तर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतं.

- मृण्मयी पगारेफॅशन ट्रेण्ड  सतत बदलत राहतो. फॅशनच्या बरोबरीनं राहायला तर सर्वांनाच आवडतं. कपड्यांच्या फॅशनपासून पायातल्या जोड्यापर्यंत सर्व काही नेहेमी बदलत असतं. हे सर्व आपल्यालाही घालून बघता यावं यासाठी अनेकजण धडपड करत असतात. अशा धडपडीतून फॅशन तर व्यवस्थित फॉलो होते. पण शरीर आणि मनाच्या आरोग्यावर मात्र विपरित परिणाम होतो.कधीमधी फॅशनच्या बरोबरीनं राहण्यात काही वाईट नाही. पण जी फॅशन फॉलो करताना आपल्या शरीराला त्रास होतो ती फॅशन आपण नेहेमी करावी का? हा प्रश्न आहे. कपडे, चपला, ज्वेलरी यांची चुकीची फॅशन जर कायम फॉलो केली तर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतं.  अतीघट्ट जीन्सजीन्स हा प्रकार सर्वच वयोगटातल्यांना आवडतो. जीन्स घातल्यानं आपण काहीतरी फॅशनेबल केलं आहे असंही अनेकांना वाटतं. जीन्स घालणं अनेकांना सोयिस्करही वाटतं पण जे सोयिस्कर वाटतं ते आपल्यासाठी अनुरूप असतं असं नाही. तेच जीन्सच्या बाबतीतही होतं. कधी कधी काही जीन्स अंगात चढवणं म्हणजे केवळ दिव्य असतं. पण अशा जीन्स अंगात घातल्यानं आपण बारीक दिसतो, आपलं वाढलेलं पोट लपतं म्हणून कशाबशा होणाऱ्या जीन्स घालण्याचा अनेकींचा हट्ट असतो. पण त्यामुळे तात्पुरतं छान दिसत असलो तरी त्यामुळे आजारांना आणि त्रासाला मात्र आमंत्रण मिळतं. सतत घट्ट जीन्स घातल्यानं पायांना बधिरता येवू शकते. पायांना सतत मुंग्या येतात. घट्ट जीन्समुळे पोट कंबर आवळ्ली जाते. पोट सतत आवळल्याच्या स्थितीत असलं तर ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ नावाचा आजार जडतो. या आजारात पोटातलं अन्न परत अन्ननलिकेत येतं. टाइट जीन्समुळे ‘कंपार्टमेंट सिंड्रोम’ नावाचा आजार होवू शकतो. यात पायावर्, पोटावर कमालीचा ताण येतो.

 

                

 टाइट स्कर्टटाइट जीन्सप्रमाणे टाइट स्कर्टही घातले जातात. टाइट स्कर्ट छानच दिसतात. पण हे स्कर्ट कमरेत घटट असल्यानं श्वासाशी संबंधित विकार होतात.

 

 थॉंग्जहल्ली आतले कपडे वापरतानाही अनेकजणी फॅशनचा विचार अधिक करतात. त्यामुळेच अनेकजणींकडे थॉंग्जचा एकतरी जोड असतो. हे थॉंग्ज खूपच कमी भाग झाकतात. त्यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तसेच मूत्र मार्गाचा संसर्गही या अशा प्रकारच्या अंतर्वस्रामुळे होवू शकतो.

जाडे भरडे कपडेअनेकदा कपड्यांमध्ये इंटरनॅशनल ब्रॅण्डस वापरण्यावर भर असतो. पण हे कपडे अनेकदा ज्या प्रक्रियेतून बनवले जातात त्या प्रक्रियेमुळे संप्रेरकांच्या असंतुलनाची ( हार्मोनल इनबॅलन्स) समस्या निर्माण होते. तसेच काही कपड्यांचे कापड तर इतके वाईट असतात की त्यातून कॅन्सरही होवू शकतो. त्यामुळे केवळ इंटरनॅशनल ब्रॅण्डसवर न जाता आपल्याला आवडलेलं कापड कसं आहे याचा विचार करावा. आणि कपड्यांच्या बाबतीत शक्यतो स्थानिक आणि लोकप्रिय ब्रॅण्डसना प्राधान्य द्यावं. हाय टो - हाय हिल्सउंच टाचांच्या चपला बुटांमुळे एकाचवेळेस उंच आणि स्लिम दिसता येतं. पण अशाच प्रकारच्या चपला सतत वापरल्याने पाठ, मणका आणि गुडघ्यांचं दुखणं मागे लागतं. अशा प्रकारच्या चपलांमुळे पावलांवर नको तितका ताण येतो. त्यामुळे पावलांवर सूज येते. यामुळे न्येरोमा नावाचा त्रास होतो. यात अशा प्रकारच्या चपला सतत वापरल्यानं टाचेतली शिर दाबली जाते.

 

     

 

 जाड जूड दागिनेहल्ली कानात, गळ्यात, हातात मोठे आणि जड दागिने घालण्याची फॅशन आहे. पण यामुळे क्षणिक सुंदरतेचा फायदा जसा होतो तसा कायमच्या त्रासाचा तोटा सुध्दा होतो. सतत लोंबते, जड आणि मोठे कानातले घातल्यानं कानाची छिद्र फाटू शकतात. गळ्यात सतत जाड जूड नेकलेस घातल्यानं मणक्यांचं दुखणं मागे लागतं. तसेच मानसिक तणावही सारखा येतो.

 

                    फिटिंग्ज ब्राआकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्ज ब्रा वापरण्याची फॅशन आहे. पण या ब्रा अनेकदा सोसवत नाही इतक्या फिट असतात. यामुळे मानेभोवतीचं दुखणं वाढतं. गळा, खांदे, पाठ आणि स्तनही सतत भरून आल्यासारखे वाटतात. यामुळे फक्त शारीरिक त्रास होतो असं नाही तर आत्मविश्वास डळमळीत होण्यासारखे मानसिक परिणामही दिसून येतात. बॉडी शेपरहल्ली तुमचं पोट दिसतं म्ह्णून अमूक पट्टा बांधा, अमूक प्रकारचे इनरवेअर घाला अशा जाहिराती येतात. त्याला भुलून अनेकजणी आपल्या पोटाचा आकार कमी करण्यासाठी ते वापरतातही. पण यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो. बॉडी शेपरमुळे पोट सतत आवळल्याच्या स्थितीत राहातं. त्यामुळे अ‍ॅसिड रिफलक्स , छातीत जळजळ होणे यासारखे विकार होतात.