भरपूर व्यायाम करून आणि डाएट करून तुम्ही वजन कमी कराल पण बेली फॅटचं काय? ते तर कमी होता कमी होत नाही. यामागे अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट करता का? अनेकदा तुमच्या बिझी शेड्युलमध्ये ब्रेकफास्ट करायचा राहुन जातो आणि याचे फार वाईट परीणाम होतात. तसंच ब्रेकफास्टमध्ये चूकीचे पदार्थ खाल्ले की देखील बेली फॅट वाढते. असे कोणते पदार्थ आहेत जे ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यामुळे बेली फॅट वाढते? हे पदार्थ तुम्ही खाण्याचे टाळा आणि बेली फॅट वाढवू नका...डॉ. सावना शुमाकर यांनी हेल्थलाईन या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनूसार बेली फॅट कमी करण्यासाठी या गोष्टी ब्रेकफास्टमध्ये अजिबात समाविष्ट करू नका.
पुरी किंवा पराठेभारतीय लोकांच्या नाश्त्यात पराठे किंवा पुऱ्या असतातच असतात पण हे अतिशय चूकीचे आहे. तुमच्या दिवसाची सुरूवात तुम्ही तेलकट पदार्थांनी का करावी? हे नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सकाळी तेलकट, तुपकट खाण्यापेक्षा तुम्ही हेल्दी खा. तुम्ही फळं खाऊ शकता, स्प्राऊट्स खाऊ शकता. तुम्ही भजी, कचोरी असे तेलकट पदार्थही टाळले पाहिजेत.
कंटेनरमधील फ्रुट ज्यूसबाजारातील कंटेनरमध्ये मिळणारे फ्रुट ज्यूस हे हेल्दी असतात असा गैरसमज आहे. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. असे ज्युसेस पिऊन तुम्ही वजन घटवण्याऐवजी वाढवता. पर्यायाने तुमचे बेली फॅटही वाढते. त्याएवजी ते फ्रुट ज्यूस घरात तयार करा. तुमचे आरोग्य आणखी समृद्ध होईल.
नुडल्ससध्या इस्टंट नुडल्सचा जमाना आहे. पण हे नुडल्स मैद्यापासून बनवलेले असतात जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. या नुडल्समध्ये फायबर तर नसतेच त्यामुळे या नुडल्सचा शरीराला काहीही फायदा न होता उलट तोटाच होतो.
केक किंवा बिस्कीटतुम्हाला केक, कुकीज, बिस्कट भलेही आवडत असतील. पण त्यांचे सेवन हे आरोग्यासाठी घातकच आहे. चूकूनही या गोष्टींचे सेवन नाश्त्याला करू नका. यात भरपूर साखर आणि मैदा असतो जो आरोग्यासाठी घातकच असतो.
प्रोसेस्ड फुडकॉर्नफ्लेक्स, चिप्स, ड्रायफ्रुट्स, स्नॅक्स आदी पदार्थ नाश्त्याला खाण्याचा सध्या ट्रेण्डच आहे. त्यापेक्षा पोहे, उपमा असे घरी बनवलेले पदार्थ खा.